तिबेटी बकर्यांचा क्लोन!

टोकियो : चीनने तिबेटी बकर्यांचा क्लोन तयार करत आणखी एक लक्षवेधी यश प्राप्त केले आहे. यापूर्वी 1997 मध्ये चीनने मेंढीचे क्लोन तयार केले होते. शिवाय, वानराचे क्लोनिंगही केले गेले आहे. जगभरातील मेंढीच्या क्लोनिंगसाठी जे तंत्रज्ञान वापरले होते, तेच तंत्रज्ञान आता पुन्हा एकदा अमलात आणले जाणार आहे.
सोमेटिक सेल क्लोनिंग तंत्राचा त्यावेळी वापर केला गेला होता. या तंत्रानुसार, कोशिकाच्या केंद्रकाला स्थानांतरित केले गेले आणि त्यानंतर ते अंडे सरोगेट आईच्या गर्भात सोडले गेले. यानंतर बकर्यांच्या पिलात आधीचा कोणताही डीएनए आढळून आला नाही. चायना सेंट्रल टेलिव्हिजनने या नव्या तंत्राचा उल्लेख केला.
या नव्या तंत्रामुळे स्थानिक शेतकर्यांची मिळकत वाढेल आणि पशुपालन उद्योगाची प्रगती होईल, असा यामागील विचार आहे. हे तंत्रज्ञान वरकरणी सोपे वाटत असले, तरी प्रत्यक्षात साकारणे बरेच आव्हानात्मक असल्याचे मत संशोधकांनी मांडले आहे.
Latest Marathi News तिबेटी बकर्यांचा क्लोन! Brought to You By : Bharat Live News Media.
