
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : गणराज स्टुडिओ प्रस्तुत, श्रेयश जाधव दिग्दर्शित ‘रणधुरंधर..’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. मराठा योद्धांच्या उदयाची गाथा सांगणारा हा चित्रपट २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी, इंग्रजी, हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड, गुजराथी आणि पंजाबी भाषेत प्रदर्शित होणार आहे. भाग्यश्री जाधव, अमित भानुशाली, अनुप अशोक देशपांडे या चित्रपटाचे निर्माता आहेत. यापूर्वीही गणराज स्टुडिओ आणि अमित भानुशाली यांनी एकत्र काम केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ते या चित्रपटाच्या माध्यमातून अशीच एक दर्जेदार कलाकृती घेऊन येत आहेत. या चित्रपटात कलाकार कोण असणार, याबाबत सध्या तरी गोपनीयता आहे.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक श्रेयश जाधव म्हणतात, ” ही कहाणी वीर योद्धांची आहे, लढाईत शत्रूला भयभीत करून सोडणाऱ्या रणधुरंधराची गाथा आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आम्ही या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा एक बिग बजेट चित्रपट असून याची भव्यता तुम्हाला चित्रपट पाहूनच जाणवेल.”
श्रेयश जाधव यांनी यापूर्वी ‘मी पण सचिन’, ‘फकाट’ असे जबरदस्त चित्रपट सिनेसृष्टीला दिले आहेत. लवकरच त्यांचे ‘डंका हरिनामाचा’, ‘जंतर मंतर छू मंतर’ हे चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
Latest Marathi News मराठा योद्धांच्या उदयाची गाथा सांगणार ‘रणधुरंधर’ Brought to You By : Bharat Live News Media.
