लालूप्रसाद यादव यांच्या टीकेनंतर भाजपची नवी मोहीम ‘मोदी का परिवार’

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा :  लोकसभा निवडणुकीपूर्वी परिवारवादावरून देशात नवा राजकीय वाद सुरू झाला. त्यामुळे भाजपला निवडणुकीपूर्वी आयते कोलीत मिळाले आहे. लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुटुंबच नाही, अशी टीका केली होती. त्यानंतर संपूर्ण देश माझे कुटुंब आहे, असे प्रत्युत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले. यानंतर देशातील प्रमुख भाजप नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी “मोदी का … The post लालूप्रसाद यादव यांच्या टीकेनंतर भाजपची नवी मोहीम ‘मोदी का परिवार’ appeared first on पुढारी.
लालूप्रसाद यादव यांच्या टीकेनंतर भाजपची नवी मोहीम ‘मोदी का परिवार’

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा :  लोकसभा निवडणुकीपूर्वी परिवारवादावरून देशात नवा राजकीय वाद सुरू झाला. त्यामुळे भाजपला निवडणुकीपूर्वी आयते कोलीत मिळाले आहे. लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुटुंबच नाही, अशी टीका केली होती. त्यानंतर संपूर्ण देश माझे कुटुंब आहे, असे प्रत्युत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले. यानंतर देशातील प्रमुख भाजप नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी “मोदी का परिवार” मोहीम सुरु केली आहे. भाजप नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एक्सवर त्यांचे बायो बदलून नावापुढे “मोदी का परिवार” असे लिहीले आहे. Modi Ka Parivar
शनिवारी राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान मोदींवर त्यांच्या कुटुंबाबाबत वैयक्तिक टीका केली होती. त्यानंतर आज एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, संपूर्ण देश त्यांचा कुटुंब आहे. पंतप्रधानांच्या या घोषणेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, नितीन गडकरी, ज्योतिरादित्य शिंदे, किरेण रीजेजु, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार मनोज तिवारी यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी एक्सवर त्यांच्या नावात बदल केला. नेत्यांनी आपल्या नावापुढे ‘मी मोदींचा परिवार’ असे लिहीले आहे. याच मुद्दयावर भाजप मुख्यालयात प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनीही पत्रकार परिषद घेतली. Modi Ka Parivar
राष्ट्रीय जनता दलाने शनिवारी पाटणा येथील गांधी मैदानावर मोठ्या सभेचे आयोजन केले होते. यात इंडिया आघाडीचे नेतेही सहभागी झाले होते. बिहारमधील जनतेला संबोधित करताना लालूप्रसाद यादव यांनी नरेंद्र मोदींवर वैयक्तिक टीका केली होती. “नरेंद्र मोदी आजकाल परिवारवादावर बोलत आहेत. मात्र त्यांना परिवार नाही. आणि ते हिंदूही नाहीत.” अशा शब्दात लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता.
लालूप्रसाद यादव यांच्या या विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले. तेलंगणातील आदिलाबाद येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “माझ्या कुटुंबामुळे इंडिया आघाडीकडून मला लक्ष्य करण्यात आले. परंतु संपूर्ण देश माझे कुटुंब आहे. देशात राहणारे सर्वच नागरिक माझ कुटूंबीय आहेत. भ्रष्टाचार आणि घराणेशाहीत बुडलेले इंडिया आघाडीचे नेते अस्वस्थ होत आहेत. आता त्यांनी २०२४ च्या निवडणुकीसाठी त्यांचा खरा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. जेव्हा मी त्यांच्या घराणेशाहीवर बोलतो तेव्हा हे लोक मोदींना कुटुंब नाही असे म्हणू लागले आहेत. उद्या ते असेही म्हणू शकतील की तुम्हाला कधीही तुरुंगवासाची शिक्षा झाली नाही, त्यामुळे तुम्ही राजकारणात येऊ शकत नाही.” असा टोलाही मोदींनी लगावला.
‘चौकीदार चोर है’ची पुनरावृत्ती?
काँग्रेसने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ‘चौकीदार चोर है’चा नारा दिला होता. त्यानंतर भाजप नेत्यांनी काँग्रेसला लक्ष्य करत ‘मैं भी चौकीदार’ मोहीम सुरू केली होती. आणि भाजप नेते, पदाधिकारी यांनी सोशल मिडियावर ‘मैं भी चौकीदार’ असे लिहीते होते. लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुटुंबच नाही, अशा स्वरुपाची टीका केल्यानंतर आता भाजपच्या वतीने “मोदी का परिवार” म्हणत प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

“My life an open book,140 crore people my family”: PM Modi hits out at INDIA bloc
Read @ANI Story | https://t.co/vYbJ25tD4U#PMModi #Telangana #Adilabad #Modifamily #INDIAbloc pic.twitter.com/VzMRJrWgb2
— ANI Digital (@ani_digital) March 4, 2024

हेही वाचा 

१४० कोटी देशवासीय हेच माझे कुटुंब : PM मोदींचे लालू प्रसादांना प्रत्‍युत्तर
Lok Sabha Election 2024 | वेध लोकसभेचे; स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रचारासाठी पं. नेहरू
Lok Sabha Election 2024 | ‘चौकीदार’नंतर आता ‘मोदी का परिवार’! लोकसभा निवडणूक २०२४ साठी भाजपचा नारा

Latest Marathi News लालूप्रसाद यादव यांच्या टीकेनंतर भाजपची नवी मोहीम ‘मोदी का परिवार’ Brought to You By : Bharat Live News Media.