लष्कराच्या चित्ता हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; आपत्कालीन लँडिंग

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: भारतीय लष्कराच्या चित्ता हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. यामुळे वैमानिकाने प्रसंगसावध होत, शेतातच हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग केले. ही घटना आज (दि.४) दुपारी १२ वाजतेच्या सुमारास घडली. दरम्यान यामध्ये भारतीय लष्कराचे दोन जवान होते. असे वृत्त एएनआयने दिले आहे. (Emergency Landing)
जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील हातल गावाजवळ (ता.सुंदरबनी) लष्कराच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर वैमानिकाने सावधगिरीने लँडिंग केले. त्यानंतर भारतीय लष्कराचे विमान पुन्हा त्याच्या स्थानावर परतले आहे, अशी माहिती भारतीय लष्करी अधिकाऱ्याने दिली आहे. असे एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. (Emergency Landing)
An Indian Army/Cheetah helicopter made a precautionary landing due to some technical issue in fields at Hathal village of Sunderbani tehsil of Rajouri district (J&K) at around 12 noon today. The chopper has now flown back to its destination: Indian Army officials pic.twitter.com/VBPBO4yuci
— ANI (@ANI) March 4, 2024
हेही वाचा:
Emergency Landing of Plane : मुंबई विमातळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
Emergency Landing : इंडिगो विमान इंजिनमध्ये बिघाड; टेक ऑफनंतर अवघ्या १३ मिनिटात लँडिंग
IndiGo Flight Emergency landing : बंगळूरहून वाराणसीला जाणारे १३७ प्रवासी थोडक्यात बचावले, इंडिगोचे इमर्जन्सी लँडिंग
Latest Marathi News लष्कराच्या चित्ता हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; आपत्कालीन लँडिंग Brought to You By : Bharat Live News Media.
