उद्धव ठाकरे आज पनवेलमध्ये

पनवेल : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीमध्ये मावळ लोकसभा मतदार संघ पुन्हा आपल्याकडेच ?ठेवण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने कंबर कसली आहे. मावळ मतदार संघ पुन्हा सर करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सोमवारी ( 4 मार्च) रायगडच्या दौर्‍यावर येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल,उरण,खोपोलीमध्ये जाहीर सभा होणार आहेत. शिवसेना,राष्ट्रवादीतील फुटीनंतर प्रथमच सर्व राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी … The post उद्धव ठाकरे आज पनवेलमध्ये appeared first on पुढारी.

उद्धव ठाकरे आज पनवेलमध्ये

पनवेल : Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीमध्ये मावळ लोकसभा मतदार संघ पुन्हा आपल्याकडेच ?ठेवण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने कंबर कसली आहे. मावळ मतदार संघ पुन्हा सर करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सोमवारी ( 4 मार्च) रायगडच्या दौर्‍यावर येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल,उरण,खोपोलीमध्ये जाहीर सभा होणार आहेत.
शिवसेना,राष्ट्रवादीतील फुटीनंतर प्रथमच सर्व राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी सामोरे जात आहे.मावळमध्ये सध्या तर महायुतीचेच वर्चस्व आहे. पनवेल, उरणमध्ये भाजप तर कर्जतमध्ये शिवसेना (शिंदे गट) यांचे आमदार आहेत. पनवेल, उरणला भाजपने चांगले प्राबल्य निर्माण केलेले आहे. त्यामुळे महायुती म्हणून येथे जो कोणी उमेदवार असेल त्याला पनवेल, उरणमधून मोठे पाठबळ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या विद्यमान खा. श्रीरंग बारणे हे शिंदे गटात सामील झालेले आहेत. त्यांनाच पुन्हा उमेदवारी मिळेल की नाही याबाबत संभ्रमावस्था आहे. बारणे यांना पुन्हा उमेदवारी दिली जाऊ नये, अशी मागणी अजित पवार गटाने केलेली आहे. त्यामुळे येथे कुणाला उमेदवारी दिली जाते याकडे लक्ष लागले आहे.
ठाकरे गटाने मात्र पिंपरी, चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविलेले आहे. त्यांच्याच जनसंपर्क कार्यालयाचे उद्धाटन करण्यासाठी ठाकरे हे सोमवारी पनवेल, उरण,खोपोलीत येणार आहेत. यानिमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. या सभेत ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दुपारी तीन वाजता बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजचे उद्घाटन उद्धव ठाकरे करणार आहेत. दुपारी चार वाजता पनवेल येथे जनसंवाद सभा घेणार आहेत. साडेपाच वाजता खोपोली तिथे सतीश झाकोटिया मैदान इथे सभा घेतली जाणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता नवीन शेवा मैदान, उरण या ठिकाणी सभा होणार आहे.
महाआघाडीत शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) सहभागी आहे. पनवेल, उरण, कर्जतमध्ये शेकापचे प्राबल्य आहे. काँग्रेसही आपले अस्तित्व टिकवून आहे. याचा फायदा ठाकरे गटाला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Latest Marathi News उद्धव ठाकरे आज पनवेलमध्ये Brought to You By : Bharat Live News Media.