महायुतीतील मित्रपक्षांकडून माझ्या जीवाला धोका : हर्षवर्धन पाटील

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : माझ्या जीवाला धोका आहे. आणि महायुतीतील मित्रपक्षांकडूनच जीवाला धोका आहे. मला मतदारसंघात फिरू न देण्याची धमकी दिली जात आहे, असा सनसनाटी आरोप माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज (दि.४) Bharat Live News Media वृत्तवाहिनीशी बोलताना केला.
पाटील म्हणाले की, महायुतीतील मित्रपक्षाचे तालुका अध्यक्ष आणि पदाधिकारी मतदारसंघातील जाहीर सभांमधून आम्हाला धमकी देत आहेत. याचे व्हिडिओ, क्लिप आमच्याकडे आहेत. मला मतदारसंघात फिरू देणार आहे. घराबाहेर पडू देणार नाही, अशी धमकी दिली जात आहे. याबाबत कारवाई करण्याचे पत्र उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. त्याची चौकशी गृह विभाग करेल, असे ते म्हणाले.
Latest Marathi News महायुतीतील मित्रपक्षांकडून माझ्या जीवाला धोका : हर्षवर्धन पाटील Brought to You By : Bharat Live News Media.
