
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : तुम्ही एक मंत्री आहात, सामान्य माणूस नाही. तुम्ही काय बोललात ते तुम्हाला माहीत आहे. तुम्हाला त्याचे परिणाम जाणवायला हवे होते. तुम्ही तुमच्या अधिकारांचा गैरवापर केला आहे, अशा शब्दांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सनातन धर्मावर आक्षेपार्ह टिपण्णी केल्या प्रकरणी द्रमुकचे नेते उदयनिधी स्ट्रलिन यांना फटकारले. ( ‘You abuse your right’: Supreme Court raps Udhayanidhi Stalin in ‘Sanatana’ case )
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये सनातन धर्म निर्मूलनाचे आवाहन करत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यावेळी त्यांनी सनातन धर्माची तुलना कोरोना आणि मलेरिया या रोगांशी केली होती. त्यांच्यावर कारवाईची मागणी करणार्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. ( ‘You abuse your right’: Supreme Court raps Udhayanidhi Stalin in ‘Sanatana’ case )
या वेळी उदयनिधी स्टॅलिन यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तीवा केला. तसेच या प्रकरणी विविध ठिकाणी दाखल झालेल्या गुन्ह्यांची एकत्र सुनावणी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच अर्नब गोस्वामी, मोहम्मद झुबेर आणि इतरांच्या खटल्यांमधील निकालांचा हवाला दिला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, “उदयनिधी स्टॅलिन हे एका राज्यातील मंत्री आहेत. सामान्य माणूस नाही. तुम्ही काय बोललात ते तुम्हाला माहीत आहे. तुम्हाला त्याचे परिणाम जाणवायला हवे होते. तुम्ही तुमच्या अधिकारांचा गैरवापर केला आहे.”
स्टॅलिन उच्च न्यायालयात दाद मागू शकतात
या प्रकरणी मला अनेक न्यायालयात जावे लागले तर माझे अशील हे याच प्रकरणामध्ये पूर्णपणे गुंतले जातील. हा खटला चालवण्याआधीचा छळ आहे, असाही सिंघवी यांनी सांगितले. यावर पुढील आठवड्यात सुनावणी होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच या प्रकरणी स्टॅलिन हे उच्च न्यायालयात दाद मागू शकतात, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
#SupremeCourt on Stalin#SupremeCourtofIndia @Udhaystalin #UdhayanidhiStalin https://t.co/S33jTYFKwt pic.twitter.com/ZW0DALkWkC
— Bar & Bench (@barandbench) March 4, 2024
Latest Marathi News “तुम्ही मंत्री आहात..”:’सनातन’ प्रकरणी सुप्रीम कोर्टाने उदयनिधींना फटकारले Brought to You By : Bharat Live News Media.
