स्वच्छतागृहाअभावी महिलांची कुचंबणा; मंदिराजवळील स्वच्छतागृह अर्धवट अवस्थेत

भीमाशंकर : श्रीक्षेत्र भीमाशंकरला भाविक व स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी केलेल्या मागणीवरून सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नातूून पोलिस ठाणे व प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले आहे. सुसज्ज भक्तनिवास तसेच बसस्थानक परिसरात सुलभ स्वच्छतागृहदेखील उभारले असून पुरेसे पाणी नसल्याने अस्वच्छता आहे. मंदिराजवळील स्वच्छतागृह अर्धवट अवस्थेत असल्याने यात महिला वर्गाची मोठी कुचंबणा होत असल्याने त्यांना उघड्यावर शौचास जावे … The post स्वच्छतागृहाअभावी महिलांची कुचंबणा; मंदिराजवळील स्वच्छतागृह अर्धवट अवस्थेत appeared first on पुढारी.

स्वच्छतागृहाअभावी महिलांची कुचंबणा; मंदिराजवळील स्वच्छतागृह अर्धवट अवस्थेत

अशोक शेंगाळे

भीमाशंकर : श्रीक्षेत्र भीमाशंकरला भाविक व स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी केलेल्या मागणीवरून सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नातूून पोलिस ठाणे व प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले आहे. सुसज्ज भक्तनिवास तसेच बसस्थानक परिसरात सुलभ स्वच्छतागृहदेखील उभारले असून पुरेसे पाणी नसल्याने अस्वच्छता आहे. मंदिराजवळील स्वच्छतागृह अर्धवट अवस्थेत असल्याने यात महिला वर्गाची मोठी कुचंबणा होत असल्याने त्यांना उघड्यावर शौचास जावे लागत आहे. यामुळे या ठिकाणी गैरसोय होत आहे.
श्रीक्षेत्र भीमाशंकरला पर्यटक व भाविकांची बाराही महिने गर्दी असते.
येथे भीमाशंकर अभयारण्य असल्यामुळे येथे निसर्गप्रेमींची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. येथे पोलिस ठाणे व आरोग्य केंद्र करण्याची मागणी वारंवार होत होती. गेल्या वर्षी बसस्थानकाजवळ पोलिस ठाण्याचे उद्घाटन झाले. परंतु येथे कर्मचारी उपस्थित नसल्याने येथील पोलिस ठाणे कायमच बंद असते. यामुळे हौशी पर्यटक दारू पिऊन धिंगाणा घालतात. यातच भाविकांंचा ओघ वाढला आहे. चारचाकी वाहने, एस.टी. बस व खासगी बस यांंची मोठी गर्दी होत आहे.
परिणामी वाहतूक कोंडी होते, तसेच छोटे अपघातदेखील होत आहेत. या घटनांना आवर घालण्यासाठी तक्रार देण्यास पोलिस ठाण्यात गेल्यास येथे कुलुप असल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊन सुरक्षेची बाब गंभीर होत आहे. दरम्यान घोडेगाव ते भीमाशंकर हे 45 किलोमीटर अंतर असून येथे काही अनुचित प्रकार घडल्यास अथवा अपघात घडल्यास घटनास्थळी येण्यास घोडेगाव पोलिसांना सुमारे एक ते दीड तास लागतो, यामुळे अपघातग्रस्तांना मदत मिळण्यास विलंब होतो.
सध्या एक पोलिस निरीक्षक आणि एखादाच कर्मचारी
भीमाशंकर येथे खेड, आंबेगाव तालुक्यांच्या सीमारेषा असल्याने अभयारण्यात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास खेड पोलिसांना सुमारे 55 ते 60 किलोमीटरवरून तर घोडेगावला सुमारे 45 किलोमीटरवरून घटनास्थळी यावे लागते. त्यात पोलिस ठाण्याच्या हद्दीच्या वादाला सुरुवात होऊन प्रत्यक्ष कारवाईला वेळ लागतो. यासाठी भीमाशंकर येथे घोडेगाव किंवा खेड पोलिस ठाण्याअंतर्गत पोलिस ठाणे न करता विशेष पोलिस ठाण्याची मंजुरी मिळून एक सहायक पोलिस निरीक्षक व सुमारे दहा कर्मचार्‍यांची कायमस्वरूपी नेमणूक करणे गरजेचे आहे. सध्या एकच पोलिस निरीक्षक असून अधूनमधून त्याला मदतीला एखादे-दोन पोलिस जातात. महत्त्वाचे म्हणजे याचा दर्जा पोलिस चौकीसारखाच आहे.
हेही वाचा

कांद्याच्या अल्पदराने शेतकर्‍याच्या डोळ्यांत पाणी : उत्पादन खर्चही निघेना
अकोला: राष्ट्रीय लोक अदालतीत ७ हजार ५९५ प्रकरणे निकाली
मुंबई : सोन्याच्या खरेदीमुळे टास्क फ्रॉडमधील आरोपी जाळ्यात

Latest Marathi News स्वच्छतागृहाअभावी महिलांची कुचंबणा; मंदिराजवळील स्वच्छतागृह अर्धवट अवस्थेत Brought to You By : Bharat Live News Media.