मॉरिशसमध्ये हिंदू उत्सवाच्या तयारीदरम्यान भीषण आग, ६ भाविकांचा मृत्यू

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: मॉरिशसमध्ये रविवारी (दि.०३) एका धार्मिक विधीदरम्यान लागलेल्या आगीत सहा हिंदू यात्रेकरूंचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले आहेत. महाशिवरात्रीच्या आधी एका उत्सवादरम्यान ही दुर्घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. असे वृत्त ‘बीबीसी’ने दिले आहे. (Mauritius fire)
मॉरिशस पोलिस आयुक्त अनिल कुमार दीप यांनी एका राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर दिलेल्या माहितीत सांगितले की, हिंदू देवतांच्या मूर्ती घेऊन जाणाऱ्या लाकडी आणि बांबूच्या गाडीला विद्युत तारांच्या संपर्कात आल्यानंतर ही आग लागली. त्यानंतर अनेक लोक या आगीच्या प्रभावाखाली आले. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाल्याचे देखील वृत्तात म्हटले आहे. (Mauritius fire
Mahujaji sita wa Kihindu wapoteza maisha baada ya kuungua moto Mauritiushttps://t.co/9PzKsh1x4D pic.twitter.com/ZMN8rrf0wz
— BBC News Swahili (@bbcswahili) March 4, 2024
Mauritius fire: परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी व्यक्त केले दुःख
भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी या दुर्घटनेवर एक्स पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, “मॉरिशसमध्ये महाशिवरात्री उत्सवादरम्यान घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेबद्दल ऐकून दुःख झाले. या कठीण प्रसंगी शोकाकुल कुटुंबीय आणि मॉरिशसच्या लोकांप्रती आम्ही शोक व्यक्त करतो.”
External Affairs Minister Dr S Jaishankar tweets “Saddened to hear about the unfortunate tragedy that occurred during the Mahashivratri celebrations in Mauritius. Our condolences to the bereaved families and the people of Mauritius at this difficult time.” pic.twitter.com/zENQOddZMR
— ANI (@ANI) March 4, 2024
हेही वाचा:
लोकसभा निवडणुकांच्या जाहीरनाम्यासाठी भाजप मागवणार जनतेकडून सूचना
Delhi Budget 2024 : महिलांना दरमहा मिळणार १ हजार रूपये; केजरीवाल सरकारची घोषणा
Radhika Merchent : कोण आहे राधिका? बहिणही आहे बिझनेसमनची पत्नी
Latest Marathi News मॉरिशसमध्ये हिंदू उत्सवाच्या तयारीदरम्यान भीषण आग, ६ भाविकांचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.
