मुंबई : सोन्याच्या खरेदीमुळे टास्क फ्रॉडमधील आरोपी जाळ्यात

मुंबई : Bharat Live News Media वृत्तसेवा : सोने खरेदीसाठी केलेल्या ऑनलाईन पेमेन्टचा धागा पकडून बोरिवली पोलिसांनी मालाडमधून मोहम्मद इम्रान जमाल मोहम्मद याला अटक केली. त्याच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.
तक्रारदार मनीष मधुसूदन राणे यांना व्हॉट्सअॅपवर, जीबीएल डिजिटल मार्केटिंगची एचआर बोलत आहे असे भासवून नोकरीचे आमिष दाखवले. पुढे वेगवेगळे ऑनलाईन प्रीपेड टास्क देऊन ते पूर्ण करण्यास सांगून त्यातून मिळणारी रक्कम काढून घेण्यासाठी पैसे भरावे लागतील किंवा अन्य कारणे सांगून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये साडेसात लाख रुपये भरण्यास भाग पाडले.
Latest Marathi News मुंबई : सोन्याच्या खरेदीमुळे टास्क फ्रॉडमधील आरोपी जाळ्यात Brought to You By : Bharat Live News Media.
