महिलांना दरमहा मिळणार १ हजार रूपये; केजरीवाल सरकारची घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : केजरीवाल सरकार पुढील वर्षापासून मुख्यमंत्री महिला सन्मान योजना (Mahila Samman Yojana) सुरू करणार आहे. या योजनेअंतर्गत १८ वर्षांवरील महिलांना दरमहा एक हजार रुपये मिळणार आहेत. दिल्लीच्या अर्थमंत्री आतिशी यांनी आज (दि.४) विधानसभेत अर्थसंकल्प (Delhi Budget 2024) सादर करताना महिलांना दरमहा १ हजार रुपये देण्याची घोषणा केली. अर्थमंत्री आतिशी यांनी २०२४-२५ या … The post महिलांना दरमहा मिळणार १ हजार रूपये; केजरीवाल सरकारची घोषणा appeared first on पुढारी.

महिलांना दरमहा मिळणार १ हजार रूपये; केजरीवाल सरकारची घोषणा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : केजरीवाल सरकार पुढील वर्षापासून मुख्यमंत्री महिला सन्मान योजना (Mahila Samman Yojana) सुरू करणार आहे. या योजनेअंतर्गत १८ वर्षांवरील महिलांना दरमहा एक हजार रुपये मिळणार आहेत. दिल्लीच्या अर्थमंत्री आतिशी यांनी आज (दि.४) विधानसभेत अर्थसंकल्प (Delhi Budget 2024) सादर करताना महिलांना दरमहा १ हजार रुपये देण्याची घोषणा केली.
अर्थमंत्री आतिशी यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी ७६ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. त्या म्हणाल्या की, दिल्लीची लोकसंख्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ १.५५ टक्के आहे. पण देशाच्या जीडीपीमध्ये दिल्लीचे योगदान दुप्पट आहे. दिल्लीतील महिलांसाठी ‘मुख्यमंत्री महिला सन्मान’ योजनाही अर्थसंकल्पात आणण्यात आली. (Delhi Budget 2024)
आतिशी म्हणाल्या की, २०१३ मध्ये आम्ही राजकारणात प्रवेश केला तेव्हा लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडाला होता. त्यावेळी नेते आणि सरकारे येत-जात होती. पण लोकांच्या जीवनात सुधारणा झाली नाही. गृहिणींचे पैसे महिन्याच्या २५ तारखेपर्यंत संपत होते. त्यांना जगण्यासाठी दागिने गहाण ठेवावे लागत. त्यामुळे सर्वसामान्यांचा मतदानावरील विश्वास उडाला होता. पण अरविंद केजरीवाल आशेचा किरण बनून आले आणि त्यांनी प्रामाणिकपणा आणि सत्याचा विश्वास देऊन प्रचंड बहुमताने सरकार स्थापन केले. देशाच्या जीडीपीमध्ये दिल्लीचे योगदान दुप्पट आहे. २०२३-२४ मध्ये देशाच्या सरासरी जीडीपीमध्ये दिल्लीचे योगदान ३.८९ टक्के असेल, असेही त्या म्हणाल्या.
Delhi Budget 2024 : मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेची घोषणा
केजरीवाल सरकार मुख्यमंत्री महिला सन्मान योजना घेऊन येत असल्याचे अर्थमंत्री आतिशी यांनी सांगितले. दिल्ली सरकार पुढील वर्षापासून मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सुरू करणार आहे. या योजनेअंतर्गत १८ वर्षांवरील महिलांना दरमहा एक हजार रुपये मिळणार आहेत.

दिल्ली की सभी महिलाओं को बधाई 🙌🙌
केजरीवाल सरकार 18 वर्ष से अधिक आयु की हर महिला को देगी ₹1,000/प्रतिमाह की सम्मान राशि।#KejriwalKaRamRajya pic.twitter.com/ZxvOr47qVV
— AAP (@AamAadmiParty) March 4, 2024

हेही वाचा : 

ED चे समन्स बेकायदेशीर, तरीही १२ मार्चनंतर उत्तर देणार : केजरीवाल
व्होट फॉर नोट प्रकरणी आता खासदार, आमदारांवर कारवाई होणार
 Loksabha Election 2024 : प्रशांत किशोर यांचा राजकीय रणनीतीकार म्हणून उदय कसा झाला?

Latest Marathi News महिलांना दरमहा मिळणार १ हजार रूपये; केजरीवाल सरकारची घोषणा Brought to You By : Bharat Live News Media.