दोन वेळेच्या जेवणासाठी 7 लाख खटले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : मुलांनी दोन वेळेचे जेवण तरी द्यावे म्हणून देशभरातील सात लाख पालकांनी खटले दाखल केले आहेत. अपत्यांविरुद्ध ज्येष्ठांचे एकूण 35 लाख खटले आहेत. लाखो ज्येष्ठ नागरिक न्यायालयांचे खेटे मारून थकले आहेत. संबंधित बातम्या  Vote-for-bribe | आमदार-खासदारांना दणका! SC च्या निर्णयाचे पीएम मोदींकडून स्वागत! म्हणाले, एक महान निर्णय… चंदीगड उपमहापौर निवडणुकीत ‘क्रॉस … The post दोन वेळेच्या जेवणासाठी 7 लाख खटले appeared first on पुढारी.

दोन वेळेच्या जेवणासाठी 7 लाख खटले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : मुलांनी दोन वेळेचे जेवण तरी द्यावे म्हणून देशभरातील सात लाख पालकांनी खटले दाखल केले आहेत. अपत्यांविरुद्ध ज्येष्ठांचे एकूण 35 लाख खटले आहेत. लाखो ज्येष्ठ नागरिक न्यायालयांचे खेटे मारून थकले आहेत.
संबंधित बातम्या 

Vote-for-bribe | आमदार-खासदारांना दणका! SC च्या निर्णयाचे पीएम मोदींकडून स्वागत! म्हणाले, एक महान निर्णय…
चंदीगड उपमहापौर निवडणुकीत ‘क्रॉस व्‍होटिंग’, भाजपने मारली बाजी
ओडिशा : जगन्नाथ मंदिरात बांगलादेशी नागरिकांचा प्रवेश, पोलिसांकडून ९ जण ताब्यात

देशभरातील ज्येष्ठांच्या एकूण 35 लाखांवर खटल्यांत सात लाखांपर्यंत प्रकरणे मुलांनी वार्‍यावर सोडल्याची, निर्वाह भत्ता न दिल्याची आहेत. जन्मदात्यांना दोन वेळचे जेवण आणि औैषधांनाही पैसे देत नसल्याची अनेक प्रकरणे आहेत. सर्वोच्च न्यायालयाने अशा स्वरूपाचे खटले त्वरित निकाली काढण्याचे निर्देश दिले आहेत. याउपर अनेक खटले 10 वर्षांपासून प्रलंबित आहेत. अस्वस्थ आधारवडांच्या यादीत उत्तर प्रदेशसह महाराष्ट्र, कर्नाटक अग्रक्रमांकावर आहेत.
मुलांनी दोन वेळेचे जेवण तरी द्यावे म्हणून देशातील 24 उच्च न्यायालयांत 7 लाख 62 खटले प्रलंबित आहेत. एकट्या राजस्थान उच्च न्यायालयात अशा स्वरूपाच्या प्रलंबित खटल्यांची संख्या 1 लाख 3 हजार 233 आहे.
देशभरात ज्येष्ठांचे प्रलंबित खटले
राज्य संख्या
उत्तर प्रदेश 4,99,169
महाराष्ट्र 3,97,338
कर्नाटक 2,76,503
बिहार 2,53,349
राजस्थान 1,09,946
मध्य प्रदेश 1,00,818
हरियाणा 94,228
पंजाब 86,377
गुजरात 82,919
झारखंड 47,684
दिल्ली 47,134
छत्तीसगड 16,894
Latest Marathi News दोन वेळेच्या जेवणासाठी 7 लाख खटले Brought to You By : Bharat Live News Media.