अनोळखी महिलेस ‘डार्लिंग’ संबोधणे हा लैंगिक छळच

कोलकाता; वृत्तसंस्था : एखाद्या व्यक्तीने अनोळखी महिलेला डार्लिंग म्हटले, तर तो लैंगिक छळ मानला जाईल. भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ अंतर्गत त्याला तुरुंगात जावे लागेल आणि दंडही भरावा लागेल, असा महत्त्वपूर्ण निकाल कोलकाता उच्च न्यायालयाने (Calcutta High Court) दिला आहे. त्याचबरोबर न्यायालयाने आरोपीची शिक्षा कायम ठेवली आहे. न्यायालयीन सुनावणीदरम्यान वकीलाने न्यायाधिशावर फेकले चप्पल, गुन्हा दाखल … The post अनोळखी महिलेस ‘डार्लिंग’ संबोधणे हा लैंगिक छळच appeared first on पुढारी.
अनोळखी महिलेस ‘डार्लिंग’ संबोधणे हा लैंगिक छळच

कोलकाता; वृत्तसंस्था : एखाद्या व्यक्तीने अनोळखी महिलेला डार्लिंग म्हटले, तर तो लैंगिक छळ मानला जाईल. भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ अंतर्गत त्याला तुरुंगात जावे लागेल आणि दंडही भरावा लागेल, असा महत्त्वपूर्ण निकाल कोलकाता उच्च न्यायालयाने (Calcutta High Court) दिला आहे. त्याचबरोबर न्यायालयाने आरोपीची शिक्षा कायम ठेवली आहे.

न्यायालयीन सुनावणीदरम्यान वकीलाने न्यायाधिशावर फेकले चप्पल, गुन्हा दाखल
पतीला दीर्घकाळ शरीरसुख नाकारणे म्हणजे कौर्यच – उच्च न्यायालय
‘दुसरी पत्नी’ म्‍हणून पोटगी नाकारता येणार नाही : मुंबई उच्च न्यायालय

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जय सेनगुप्ता म्हणाले की, आरोपी दारूच्या अथवा अन्य कोणत्याही नशेत असला, तरी त्याने एखाद्या अनोळखी महिलेला डार्लिंग म्हटले, तर तो लैंगिक छळ मानला जाईल. न्यायमूर्ती सेनगुप्ता यांनी अपीलकर्ता आरोपी जनक रामची शिक्षा कायम ठेवली आहे. त्याने मद्यधुंद अवस्थेत पकडल्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्याला म्हटले होते की, डार्लिंग तू चालान काढायला आली आहेस का?
कोणत्याही अज्ञात महिलेला ‘डार्लिंग’ या शब्दाने संबोधता येणार नाही. हे अपमानास्पद असून आरोपीचे शब्द लैंगिक टिप्पणी आहेत. आरोपीने न्यायालयात दावा केला की, टिप्पणीच्या वेळी तो मद्यधुंद अवस्थेत होता. मात्र, त्याचे हे कारण न्यायालयाने फेटाळून लावले.
हेही वाचा : 

High court : पत्नीला चारचौघात कानाखाली लगावने विनयभंगाचा गुन्हा ठरत नाही : उच्च न्यायालय
कर्ज आहे म्हणून पोटगी नाकारू शकत नाही ; पतीला न्यायालयाचा दणका
Law News : पतीने आपल्या आईला वेळ आणि पैसा देणे हा पत्नीचा छळ नाही; सत्र न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News अनोळखी महिलेस ‘डार्लिंग’ संबोधणे हा लैंगिक छळच Brought to You By : Bharat Live News Media.