दूध अनुदानाची 25 टक्के रक्कमही वितरित नाही

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारच्या गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत. विशेषतः दुधाळ जनावरांची माहिती ऑनलाइनवर अपलोड करताना शेतकर्‍यांसह दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकर्‍यांना योजनेच्या पहिल्या महिन्यातील 280 कोटींपैकी अनुदानाची 25 टक्के रक्कमही वितरित झालेली नाही, अशी माहिती राज्य … The post दूध अनुदानाची 25 टक्के रक्कमही वितरित नाही appeared first on पुढारी.

दूध अनुदानाची 25 टक्के रक्कमही वितरित नाही

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्य सरकारच्या गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत. विशेषतः दुधाळ जनावरांची माहिती ऑनलाइनवर अपलोड करताना शेतकर्‍यांसह दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकर्‍यांना योजनेच्या पहिल्या महिन्यातील 280 कोटींपैकी अनुदानाची 25 टक्के रक्कमही वितरित झालेली नाही, अशी माहिती राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांनी दिली.
राज्य सरकारने दूध अनुदान योजनेला एक महिन्याची दिलेली मुदतवाढ शेतकर्‍यांना दिलासा देणारी असून, प्रत्यक्षात अनुदान वाटपात येत असलेल्या अडचणी संघाने शासनाला कळविल्या आहेत. येणार्‍या अडचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, दुग्धव्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दुग्धव्यवसाय विकास सचिव तुकाराम मुंडे आदींना कळविण्यात आल्या असून, तत्काळ उपाययोजना झाल्यास शेतकर्‍यांना वेळेत अनुदान वितरण सुरू होण्यास मदत होईल, असेही त्यामध्ये नमूद केले आहे. शासनाने दिलेल्या अ‍ॅपमध्ये गायीचा प्रकार नमूद नसल्याने तो शोधून परत पशुधन अ‍ॅपमध्ये माहिती अद्ययावत करावी लागत आहे. ज्या वेळी जनावरांचे टॅगिंग झाले त्या वेळी जे आहे तीच माहिती आत्तापण दिसत आहे. ती दुरुस्ती करावी लागत आहे. जर गाय विकत घेतली असेल तर फार्मर आयडी नवीन मालकाचा अद्ययावत करावा लागत आहे.
गायीच्या दुधाबाबतची माहिती पशुधन अ‍ॅपमध्ये अद्ययावत नसल्याने ती भरावी लागत आहे. सर्व ठिकाणी अशा स्वरूपाची माहिती अद्ययावत करण्यासाठी इंटरनेटसेवा आणि पुरेसा कर्मचारीवर्ग नाही. पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचार्‍यांवर कामकाजाचा ताण असल्यामुळे जनावरांच्या टॅगिंगसह अन्य कामे वेळेत पूर्ण करण्यासही अडचणी येत आहेत. ऑनलाइनवर पहिल्याच महिन्यातील परिपूर्ण माहिती भरली गेली नसल्याने अनुदान मिळण्यास विलंब होत आहे. तरी दुग्धव्यवसाय विभागाने या अडचणी सोडवून शेतकर्‍यांना दिलासा देण्याची मागणी केल्याची माहितीही म्हस्के यांनी दिली. दरम्यान, प्रादेशिक दुग्धव्यव साय विकास अधिकारी कार्यालयातून अनुदान रक्कम वितरणाची माहिती उपलब्ध झालेली नाही.
हेही वाचा

अद्यापही शंभर लाख टन उसाचे गाळप अपेक्षित
पुणे महापालिकेची शाळा नंबर वन; पीसीएमसी दुसर्‍या क्रमांकावर
तापमानवाढ रोखण्यासाठी बर्फवृष्टीचा प्रस्ताव विचाराधीन

Latest Marathi News दूध अनुदानाची 25 टक्के रक्कमही वितरित नाही Brought to You By : Bharat Live News Media.