मस्क यांची मोठी घोषणा, गाझा, इस्रायलमधील रुग्णालयांना मदत
पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल आणि हमास युद्धाचे पडसाद जगभर उमटले आहेत. अद्याप हे युद्ध धगधगत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ चे सीईओ आणि प्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क यांनी नुकतीच मोठी घोषणा केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “मीडिया साइट ‘X’ आपल्या जाहिरातींचा महसूल युद्धग्रस्त गाझा आणि इस्रायलमधील रुग्णालयांना दान करेल. (Israel-Hamas War)
Israel-Hamas War : गाझा आणि इस्रायलमधील रुग्णालयांना मदत
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या ‘X’ (ट्विटर) ची मालकी हक्क मिळाल्यापासून ‘X’ सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) अनेक भन्नाट असे निर्णय घेवून नेहमी चर्चेत राहिले आहेत. मध्यंतरी “दहशतवादी संघटनांसाठी ‘X’ वर कोणतेही स्थान नाही” असे सांगत हमासशी संलग्न असेली अनेक अकाऊंट त्यांनी हटवली होती. आता त्यांनी हमास आणि इस्रायलच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण अशी घोषणा केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की,”सोशल मीडिया साइट ‘X’ आपला जाहिरातींचा महसूल युद्धग्रस्त गाझा आणि इस्रायलमधील रुग्णालयांना दान करेल.
इस्रायल डिफेन्स फोर्स आणि हमास यांच्यातील भीषण लढाई दरम्यान ही घोषणा करण्यात आली आहे. आत्तापर्यंत या युद्धात १३,००० हून अधिक लोक मारले गेले आहेत. तर हजारो लोक जखमी झाले आहेत. गाझामधील रुग्णालये या हल्ल्यात अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहेत. अशा स्थितीत मस्क यांनी घेतलेल्या निर्णयाचे जगभर कौतुक होत आहे.
X Corp will be donating all revenue from advertising & subscriptions associated with the war in Gaza to hospitals in Israel and the Red Cross/Crescent in Gaza
— Elon Musk (@elonmusk) November 21, 2023
हेही वाचा
Israel-Hamas War News | गाझामध्ये ४ दिवस युद्धविराम, ५० ओलिसांच्या सुटकेसाठी इस्रायल- हमासमध्ये करार
Israel-Hamas War News | इस्रायल-हमास युद्धात नागरिकांच्या मृत्यूचा तीव्र निषेध, संवादाने संघर्ष निवळू शकतो- पीएम मोदी
Israel-Hamas War : १६ वर्षांनंतर हमासने गाझा पट्टीवरील नियंत्रण गमावले; इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांचा दावा
The post मस्क यांची मोठी घोषणा, गाझा, इस्रायलमधील रुग्णालयांना मदत appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल आणि हमास युद्धाचे पडसाद जगभर उमटले आहेत. अद्याप हे युद्ध धगधगत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ चे सीईओ आणि प्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क यांनी नुकतीच मोठी घोषणा केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “मीडिया साइट ‘X’ आपल्या जाहिरातींचा महसूल युद्धग्रस्त गाझा आणि इस्रायलमधील रुग्णालयांना दान करेल. (Israel-Hamas War) Israel-Hamas War : …
The post मस्क यांची मोठी घोषणा, गाझा, इस्रायलमधील रुग्णालयांना मदत appeared first on पुढारी.