जळगाव: सुसरी येथे भरदिवसा ३ लाखांची घरफोडी   

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : भुसावळ तालुक्यातील सुसरी येथे बनावट चावीच्या मदतीने वृध्दाचे बंद घरातून ३ लाख १० हजार रूपयांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी शनीवारी रात्री वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरणगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील सुसरी गावात शेतकरी दिलीप पंडीत पाटील हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी (दि. २) त्यांचे … The post जळगाव: सुसरी येथे भरदिवसा ३ लाखांची घरफोडी    appeared first on पुढारी.

जळगाव: सुसरी येथे भरदिवसा ३ लाखांची घरफोडी   

जळगाव, Bharat Live News Media वृत्तसेवा : भुसावळ तालुक्यातील सुसरी येथे बनावट चावीच्या मदतीने वृध्दाचे बंद घरातून ३ लाख १० हजार रूपयांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी शनीवारी रात्री वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरणगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील सुसरी गावात शेतकरी दिलीप पंडीत पाटील हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी (दि. २) त्यांचे घर बंद होते. अज्ञात चोरट्यांनी घर बंद असल्याचा फायदा घेवून बंद घराचे कूलूप बनावट चावीने उघडून कपाटात ठेवलेले ३ लाख १० हजारांची रोकड चोरून नेली.
या प्रकरणी दिलीप पाटील यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून रात्री अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार श्रावण जवरे करीत आहे.
हेही वाचा 

जळगाव: व्हिडिओ व्हायरलची धमकी देऊन महिलेवर अत्याचार; आरोपीला अटक
Mothers Milk Bank | नाशिक विभागातली बाळांसाठी आईच्या दुधाची पहिली बँक जळगावमध्ये
जळगाव : महानगरपालिकांतर्गत नव्या रस्त्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

Latest Marathi News जळगाव: सुसरी येथे भरदिवसा ३ लाखांची घरफोडी    Brought to You By : Bharat Live News Media.