पुढारी ऑनलाईन डेस्क : “आपली भाषणाची वेळ संदली आहे. आदर्श आचारसंहितेचे पालन करा,” अशी सूचना करणार्या पोलीस निरीक्षकाला ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) नेते अकबरुद्दीन ओवेसी (Akbaruddin Owaisi) उघड धमकीच दिली. मला थांबवण्याची हिंमत करणारा अजून जन्माला आलेला नाही. माझा एक इशारा तुम्हाला तेथून हाकलण्यासाठी पुरेसा ठरेल, असे अत्यंत उद्धटपणे त्यांनी पोलीस निरीक्षकांना सुनावले. हैदराबादच्या ललिताबागमध्ये आयाेजित जाहीर सभेत ते बोलत हाेते.
AIMIM leader Akbaruddin Owaisi : नेमकं काय घडलं ?
तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहचली आहे. अकबरुद्दीन ओवेसी हे हैदराबादच्या ललिताबागमध्ये जाहीर सभेत बोलत होते. नियमानुसार त्यांच्या भाषणाची वेळ संपली. नियम सांगण्यासाठी संतोषनगर येथील पोलिस निरीक्षक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आपली भाषणाची वेळ संदली आहे. आदर्श आचारसंहितेचे पालन करा, अशी सूचना केली. यावर अकबरुद्दीन ओवेसी यांना संताप अनावर झाला. त्यांनी सूचनाचे पालन करण्यास सांगणार्या पोलीस निरीक्षकालाच उघडपणे धमकी दिली.
मला थांबवण्याची हिंमत करणारा अजून जन्माला आलेला नाही…
यावेळी अकबरुद्दीन ओवेसी म्हणाले की, “चाकू आणि गोळ्यांचा सामना करून मी अशक्त झालो असे वाटते का? माझ्यात अजून खूप हिंमत आहे. अजून पाच मिनिटे बाकी आहेत मी पाच मिनिटे बोलेन. मला थांबवण्याची हिंमत करणारा अजून जन्माला आलेला नाही. माझ्याकडे माझे घड्याळ आहे, तुम्ही येथून चालते व्हा. तुम्ही येथून गेला नाही तर माझा समर्थकांना केलेला एक इशारा तुम्हाला येथून हाकलण्यासाठी पुरेसा ठरेल.” पोलीस निरीक्षकांना धमकी दिल्यानंतर त्यांनी समर्थकांना विचारणा करुन ते म्हणाले की, मी बरोबर बोलत आहेत ना ? मी सिग्नल दिला तर तुम्हाला इथून पळून जावे लागेल, आम्ही त्यांना पळायला लावू का? मी तुम्हांला सांगतोय की हे लोक आम्हाला कमकुवत करण्यासाठी असे येतात.”, असे प्रक्षोभक विधानही त्यांनी केले. ( AIMIM leader Akbaruddin Owaisi )
“If I signal…” AIMIM leader Akbaruddin Owaisi threatens police inspector
Read @ANI Story | https://t.co/jKM8Lgt3TM#AIMIM #AkbaruddinOwaisi #TelanganaPolice pic.twitter.com/fGUaqQARwg
— ANI Digital (@ani_digital) November 22, 2023
अकबरुद्दीन ओवेसी ‘एआयएमआयएम’चे सर्वात श्रीमंत उमेदवार
अकबरुद्दीन ओवेसी ‘एआयएमआयएम’चे सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. ते चंद्रयानगुट्टा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.त्यांनी निवडणूक लढविण्यासाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे ४.५० कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर त्यांच्या पत्नीकडे 4.95 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर विविध गुन्ह्यांबाबत चार गुन्हेही दाखल आहेत.
हेही वाचा :
माझ्याविरुद्ध हैदराबादमध्ये लढा : ओवेसींचे राहुल गांधींना आव्हान
औरंगाबाद : अकबरोद्दीन ओवेसी यांनी घेतले औरंगजेबच्या कबरीचे दर्शन
Asaduddin Owaisi : अससूद्दीन ओवेसी यांची ‘द केरला स्टोरी’ चित्रपटावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका, म्हणाले…
The post “मला थांबवणारा अजून जन्माला आलेला नाही…” ओवेसींची थेट पोलिसांनाच धमकी appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : “आपली भाषणाची वेळ संदली आहे. आदर्श आचारसंहितेचे पालन करा,” अशी सूचना करणार्या पोलीस निरीक्षकाला ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) नेते अकबरुद्दीन ओवेसी (Akbaruddin Owaisi) उघड धमकीच दिली. मला थांबवण्याची हिंमत करणारा अजून जन्माला आलेला नाही. माझा एक इशारा तुम्हाला तेथून हाकलण्यासाठी पुरेसा ठरेल, असे अत्यंत उद्धटपणे त्यांनी पोलीस निरीक्षकांना सुनावले. हैदराबादच्या …
The post “मला थांबवणारा अजून जन्माला आलेला नाही…” ओवेसींची थेट पोलिसांनाच धमकी appeared first on पुढारी.