हिंगोली लोकसभेच्या जागेसाठी शिष्टमंडळ धडकले गोविंद बागेत

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता असल्याने सर्वच पक्षांमधील इच्छुकांच्या हालचाली वाढल्या आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज (दि.३) थेट गोविदबागेत जावून हिंगोली लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याची मागणी केली. विशेष म्हणजे यावेळी खासदार पवार यांनी हिंगोलीच्या जागेबाबत 6 मार्च रोजी अंतिम निर्णय होईल, असे स्पष्ट केल्याने पुन्हा … The post हिंगोली लोकसभेच्या जागेसाठी शिष्टमंडळ धडकले गोविंद बागेत appeared first on पुढारी.

हिंगोली लोकसभेच्या जागेसाठी शिष्टमंडळ धडकले गोविंद बागेत

हिंगोली; Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता असल्याने सर्वच पक्षांमधील इच्छुकांच्या हालचाली वाढल्या आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज (दि.३) थेट गोविदबागेत जावून हिंगोली लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याची मागणी केली. विशेष म्हणजे यावेळी खासदार पवार यांनी हिंगोलीच्या जागेबाबत 6 मार्च रोजी अंतिम निर्णय होईल, असे स्पष्ट केल्याने पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये हिंगोलीच्या जागेवरून रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. Lok Sabha Election 2024
महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गट व काँग्रेसने यापुर्वीच हिंगोली लोकसभा मतदार संघावर दावा सांगितला आहे. आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसनेच्या शिष्टमंडळाने थेट पक्षप्रमुख खासदार शरद पवार यांची बारामती येथील गोविंदबागेत रविवारी भेट घेऊन हिंगोली लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला सोडण्यात यावा अशी मागणी केली आहे. शिष्टमंडळात शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी जि.प.उपाध्यक्ष अनिल पतंगे, मनिष आखरे, संजय दराडे, माधव कोरडे, रवि गडदे, बंडू मुटकुळे, बाळु मामा ढोरे, तान्हाजी बेंडे, वसंतराव पतंगे, जिजामामा हरणे, सचिन भोसले, उमेश देशमुख, शिवाजी शिंदे, बाबाभाई, दौलत हुंबार, संचित गुंडेवार, रत्नमाला शिंदे, गणेश कमळू, संजय काकडे आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाशी चर्चा करताना खासदार शरद पवार यांनी महाविकास आघाडीची अंतिम बैठक 6 मार्च रोजी होणार आहे. या बैठकीत हिंगोलीच्या जागेबाबत निर्णय होईल असे स्पष्ट केले. यावेळी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची देखील उपस्थिती होती. खासदार सुळे यांनी हिंगोलीच्या कार्यकर्त्यांची विचारपूस करून त्यांना पक्ष वाढीसाठी महत्वाच्या सुचना केल्या. Lok Sabha Election 2024
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुट पडल्याचे चित्र इतरत्र दिसत असताना मात्र हिंगोली जिल्ह्यातील शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. शिष्टमंडळात वसमतचे आमदार राजू पाटील नवघरे वगळता सर्वच दिग्गज पदाधिकारी उपस्थित होेते. त्यांनीही हिंगोली लोकसभा महाविकास आघाडीतून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाच सोडावी अशी मागणी केली आहे. मागील काही महिन्यांपासून आमदार राजू पाटील नवघरे हे जरी अजित पवार गटात गेल्याची चर्चा असली तरी वसमत विधानसभा मतदार संघात मात्र ते माजी मंत्री दांडेगावकर यांच्या सोबत सावलीसारखे राहत असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा 

Lok Sabha Election 2024 : हिंगोलीची जागा ठाकरे गटाकडे जाणार?
हिंगोलीत नराधम पित्याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार
हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यात जमा केलेला २ हजार ब्रास रेती साठा जप्त

Latest Marathi News हिंगोली लोकसभेच्या जागेसाठी शिष्टमंडळ धडकले गोविंद बागेत Brought to You By : Bharat Live News Media.