पुण्यात विचित्र अपघात; एसटी बसने पाच वाहनांना उडवले

पुणे; पुढारी ऑनलाईन डेस्क : पुण्यातील फातीमानगर परिसरात भीषण अपघात घडला असून, एसटी बसने सात वाहनांना उडवले आहे. घडलेल्या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. भरधाव एसटीने दोन मोटारींसह पाच दुचाकींना धडक दिली आहे. एसटी बसचालकला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घडलेल्या अपघाताची माहिती अशी की, ज्या एसटी बसने वाहनांना उडवले ती एसटी बस सांगोला येथून … The post पुण्यात विचित्र अपघात; एसटी बसने पाच वाहनांना उडवले appeared first on पुढारी.

पुण्यात विचित्र अपघात; एसटी बसने पाच वाहनांना उडवले

पुणे; पुढारी ऑनलाईन डेस्क : पुण्यातील फातीमानगर परिसरात भीषण अपघात घडला असून, एसटी बसने सात वाहनांना उडवले आहे. घडलेल्या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. भरधाव एसटीने दोन मोटारींसह पाच दुचाकींना धडक दिली आहे. एसटी बसचालकला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
घडलेल्या अपघाताची माहिती अशी की, ज्या एसटी बसने वाहनांना उडवले ती एसटी बस सांगोला येथून पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँडकडे जात होती. फातिमानगर येथील काळूबाई मंदिर चौक परिसरात बसचे ब्रेक अचानक निकामी झाले असता त्यामुळे चालकाचे एसटी बसवरील नियंत्रण सुटले. या दरम्यान बसने दोन चार चाकी गाड्यांसह पाच दुचाकींना धडक दिली. या अपघातात मोटारीतील आठ वर्षीय मुलगा डोक्याला गंभीर मार लागून जखमी झाला आहे. तर, इतर सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत असून पोलिसांनी एसटी चालक चंद्रशेखर स्वामी (रा. सांगोला)याला ताब्यात घेतले. याबाबत रात्री उशिरापर्यंत वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू होते.
बसमध्ये होते 30 प्रवासी..
पुण्यातील हडपसर रस्त्या कायमच प्रचंड वर्दळीचा असतो. या मार्गावर कायमच वाहतूक कोंडी असलेली दिसून येते.
दरम्यान, मंगळवारी रात्री या मार्गावर रामटेकडी येथे मोठा अपघात झाला. सांगोला ते स्वारगेट एसटी बस हडपसर येथील रामटेकडी पुलावरून रात्री फातिमानगर येथील काळूबाई मंदिर चौक परिसरात अपघात झाला बसमध्ये अपघाताच्या वेळी 30 प्रवासी यावेळी होते.
अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी
दरम्यान,ब्रेक न लागल्याने बसने चार ते पाच वाहनांना धडक दिल्यानंतर यामध्ये काही कारचा चक्काचूर झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. तर चार ते पाच नागरीक जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
हेही वाचा
नारायणगाव ग्रामपंयतीच्या उपसरपंचपदी कोणाची वर्णी?
Nashik News : सिटीलिंक वाहकांचे पुन्हा आंदोलन, वेतन थकविल्याने काम बंद
मराठवाड्यातील रब्बीचा पेरा घटला
The post पुण्यात विचित्र अपघात; एसटी बसने पाच वाहनांना उडवले appeared first on पुढारी.

पुणे; पुढारी ऑनलाईन डेस्क : पुण्यातील फातीमानगर परिसरात भीषण अपघात घडला असून, एसटी बसने सात वाहनांना उडवले आहे. घडलेल्या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. भरधाव एसटीने दोन मोटारींसह पाच दुचाकींना धडक दिली आहे. एसटी बसचालकला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घडलेल्या अपघाताची माहिती अशी की, ज्या एसटी बसने वाहनांना उडवले ती एसटी बस सांगोला येथून …

The post पुण्यात विचित्र अपघात; एसटी बसने पाच वाहनांना उडवले appeared first on पुढारी.

Go to Source