अहमदनगरमधील नालेगाव परिसरात आढळला मृत अवस्थेतील बिबट्या

अहमदनगर Bharat Live News Media वृत्तसेवा : अहमदनगर जिल्ह्यातील नालेगाव परिसरातील गायके मळा येथे पांडुरंग पाठक यांच्या विहिरीत बिबट्या मृत अवस्थेत सापडला आहे. विहिरीत बिबट्या पडलेला असल्याची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन बिबट्याला बाहेर काढले. मृत बिबट हा नर असून साधारण पाच ते सहा वर्षाचा असावा असा अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.
माहितीनुसार, अहमदनगर शहराच्या जवळील केडगाव येथील अंबिका नगर भागात भरवस्तीत गेल्या आठ दिवसापूर्वी वन विभागाने एक बिबट्या जेरबंद केला होता. शहराच्या मध्यवर्ती भागातच बिबट्यांचे संचार होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
हेही वाचा
जेव्हा वाघानेच उचलले नदीतील प्लास्टिक!
चंद्रपूर : वाघाची रानगव्याशी झुंज; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
GREEN PIGEON : वाघांच्या जंगलात दुर्मीळ ‘ग्रीन पिजन’चे वास्तव्य
Latest Marathi News अहमदनगरमधील नालेगाव परिसरात आढळला मृत अवस्थेतील बिबट्या Brought to You By : Bharat Live News Media.
