
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडपाठोपाठ हॉलीवूडमध्ये जम बसवणारी प्रियांका चोप्रा ( Priyanka Chopra ) सध्या आपल्या अनेक चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. तिच्याकडे सध्या बरेच प्रोजेक्टस् देखील आहेत. यात आणखी भर घालत तिने शनिवारी आणखी एका नव्या हॉलीवूड चित्रपटाची घोषणा केली आणि तो चित्रपट आहे ‘द ब्लफ ‘ !
संबंधित बातम्या
Varalaxmi Sarathkumar : हनुमान फेम वरलक्ष्मी सरथकुमारने उरकला साखरपुडा; सुंदर फोटो व्हायरल
Anant-Radhika Pre Wedding : प्री-वेडिंगला प्रेग्नंट दीपिकावर खिळल्या नजरा; ‘दिल धडकने दो’वर कल्ला (video)
Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding : तीन खान थिरकले ‘नाटू- नाटू’ वर
खरं तर प्रियांका ( Priyanka Chopra ) या चित्रपटात झळकणार असल्याचे वृत्त यापूर्वीच चर्चेत आले होते. पण, त्यावर प्रियांकाने काही प्रतिक्रिया दिली नव्हती. तसेच, अगदी निर्मात्यांनीही काही घोषणा केली नव्हती. प्रियांकाने शनिवारी मात्र, यावर अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. ‘द ब्लफ’ या नव्या चित्रपटात प्रियांका हॉलीवूड अभिनेता कार्ल अर्बनसह झळकणार आहे. प्रियांकाचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
हा चित्रपट १९ व्या शतकातील कॅरेबियन खंडातील एका समुद्री महिला लुटारूच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण ऑस्ट्रेलियात होणार असल्याचे प्राथमिक संकेत आहेत. ‘द ब्लफ’ या चित्रपटाशिवाय प्रियांकाकडे आणखी बरेच हॉलीवूडपट हाताशी आहेत. यामध्ये जॉन सीनासह ‘हेड ऑफ स्टेट’, ‘सिटाडेल-२ यांचा प्राधान्याने समावेश आहे. याशिवाय, प्रियांका आलिया भट्ट ले जरा’ या माध्यमातून पुनरागमन व कॅटरिना कैफ यांच्यासह ‘जी चित्रपटाच्या बॉलीवूडमध्येही करणार आहे.
View this post on Instagram
A post shared by Priyanka (@priyankachopra)
Latest Marathi News प्रियांका चोप्राने केली ‘द ब्लक’ ची घोषणा Brought to You By : Bharat Live News Media.
