“योग्य वेळी योग्य तो निर्णय घेऊ”- खासदार नवनीत राणा

अमरावती, पुढारी वृत्तसेवा: माझी आणि रवी राणा यांची नेहमीच महाराष्ट्रात चर्चा सुरू असते. आम्ही बोललो तरी चर्चा होते आणि नाही बोललो तरी चर्चा होते. त्यामुळे आम्ही योग्य वेळी योग्य तो निर्णय घेऊ; अशा शब्दात खासदार नवनीत राणा यांनी त्यांच्या भाजप प्रवेशावर सूचक वक्तव्य केले आहे. (Lok Sabha Election 2024) खासदार नवनीत राणा लवकरच भाजपमध्ये प्रवेश … The post “योग्य वेळी योग्य तो निर्णय घेऊ”- खासदार नवनीत राणा appeared first on पुढारी.
“योग्य वेळी योग्य तो निर्णय घेऊ”- खासदार नवनीत राणा

अमरावती, Bharat Live News Media वृत्तसेवा: माझी आणि रवी राणा यांची नेहमीच महाराष्ट्रात चर्चा सुरू असते. आम्ही बोललो तरी चर्चा होते आणि नाही बोललो तरी चर्चा होते. त्यामुळे आम्ही योग्य वेळी योग्य तो निर्णय घेऊ; अशा शब्दात खासदार नवनीत राणा यांनी त्यांच्या भाजप प्रवेशावर सूचक वक्तव्य केले आहे. (Lok Sabha Election 2024)

खासदार नवनीत राणा लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आणि त्या अमरावती लोकसभा निवडणूक कमळ चिन्हावर लढणार अशी चर्चा आहे. या संदर्भात त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर राणा यांनी रविवारी (दि.३) माध्यमांना प्रतिक्रिया दिली. आम्ही एनडीए सोबत आहोत. त्यामध्ये काही नवल वाटण्यासारखं नाही. उद्या (दि.४ सोमवार) नागपूर येथे होणाऱ्या ‘नमो युवक’ संमेलनात एनडीएचा घटक म्हणून मी उपस्थित राहणार आहे, असेही खासदार नवनीत राणा म्हणाल्या. (Lok Sabha Election 2024)

दरम्यान अमरावती लोकसभेच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटांमध्ये सध्या रस्सीखेच सुरू आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ या जागेवर पुन्हा एकदा निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. त्यामुळे त्यांनी ही जागा शिवसेनेच्याच वाट्याला येईल असे सांगत नवनीत राणा या भाजपमध्ये गेल्या आणि भाजप ने त्यांना तिकीट दिल्यास राजकारण सोडू पण राणांच्या प्रचाराला जाणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली होती. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना खासदार नवनीत राणा यांनी, कोण काय बोलते यावर आपण बोलणार नाही. कोण राजकारण सोडेल आणि कोण नाही हा माझा विषय नाही असे त्या म्हणाल्या. (Lok Sabha Election 2024)

हेही वाचा:

Madhavi Latha : ओवेसीविरोधात भाजपने उमेदवारी दिलेल्या माधवी लता कोण आहेत ?
Maharashtra Politics : ‘ईव्‍हीएम’चा घोटाळा करुन भाजप निवडणूक जिंकेल : उद्धव ठाकरे
 Loksabha Election 2024 : प्रशांत किशोर यांचा राजकीय रणनीतीकार म्हणून उदय कसा झाला? ते नरेंद्र मोदींपासून का दुरावले?

Latest Marathi News “योग्य वेळी योग्य तो निर्णय घेऊ”- खासदार नवनीत राणा Brought to You By : Bharat Live News Media.