ओवेसीविरोधात भाजपने उमेदवारी दिलेल्या माधवी लता कोण आहेत ?
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. कधीही आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपने शनिवारी १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपने तेलंगणातील हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून कोम्पेला माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे. सध्या या मतदारसंघाचे एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी खासदार आहेत. आता माधवी लता ओवेसी यांच्यासमोर आव्हान उभे करणार का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. Madhavi Latha
कोण आहेत माधवी लता
कोटी महिला महाविद्यालयातून राज्यशास्त्रातून एमए पदवी घेतलेल्या माधवी लता विरिंची हॉस्पिटलच्या अध्यक्षा असून लोपामुद्रा चॅरिटेबल ट्रस्ट आणि लतामा फाउंडेशनच्या प्रमुख आहेत. त्या सोशल मीडियावरही सक्रिय असतात. त्यांनी अनेकदा हिंदुत्वासाठी आवाज उठविला आहे. त्या भरतनाट्यम नृतिका म्हणून प्रसिद्ध आहेत. हैदराबादमध्ये सामाजिक कार्यात त्या कायम सक्रीय असतात. त्याचबरोबर ट्रस्ट, संस्था, आरोग्यसेवा, शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या त्यांची हिंदू धर्मासंबंधीची भाषणे लोकांमध्ये खूप लोकप्रिय होत आहेत.
Madhavi Latha हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून ओवेसी कुटुंबाचे वर्चस्व
हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून ओवेसी कुटुंबाचे वर्चस्व राहिले आहे. ओवेसींचा हा बालेकिल्ला मानला जातो. असदुद्दीन ओवेसी यांचे वडील सुलतान सलाउद्दीन ओवेसी १९८४ मध्ये पहिल्यांदा या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. २००४ पर्यंत ते खासदार राहिले. त्यानंतर आतापर्यंत असदुद्दीन ओवेसी यांनी खासदार पद आपल्या हातात कायम ठेवले आहे. त्यामुळे हा मतदारसंघ ओवेसी यांच्या ताब्यातून खेचून घेण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे करण्यासाठी माधवी लता यांना रिंगणात उतरवले आहे.
भाजपकडून पहिल्यांदाच महिलेला उमेदवारी
हैदराबाद मतदारसंघातून भाजपने पहिल्यांदाच महिलेला उमेदवारी दिली आहे. यापूर्वी पक्षाने भागवत राव यांना उमेदवारी दिली होती. मात्र, भागवत यांना ओवेसींकडून सुमारे ३ लाख मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. यावेळी भाजपने महिला उमेदवार देऊन लढत चुरशीचा करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, ओवेसी यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात पराभूत करणे मोठे आव्हान आहे. त्यामुळे ओवेसींच्या बालेकिल्ल्यात हिंदुत्ववादी चेहरा विजयी होणार का ? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा
Lok Sabha Election 2024 : मोठी बातमी! भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर
Lok Sabha Election 2024 | वेध लोकसभेचे; धनगर समाजाचे पहिले खासदार
Nana Patole : पटोलेंच्या एकला चलो रे नीतीने काँग्रेस संकटात..
The post ओवेसीविरोधात भाजपने उमेदवारी दिलेल्या माधवी लता कोण आहेत ? appeared first on Bharat Live News Media.