हनुमान फेम वरलक्ष्मी सरथकुमारने उरकला साखरपुडा (photos)

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : हनुमान फेम आणि दाक्षिणात्य अभिनेत्री वरलक्ष्मी सरथकुमार ( Varalaxmi Sarathkumar ) हिचे नुकतेच तिचा साखरपुडा उरकला आहे. वरलक्ष्मी सरथकुमार तिचा बॉयफ्रेंड आर्ट गॅलरिस्ट निकोलाई सचदेव यांच्याशी लग्न करत आहे. या साखरपुढ्याला तिच्या जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळींनी आवर्जून हजेरी लावली आहे. वरलक्ष्मी आणि निकोलाई हे दोघेजण १४ वर्ष एकमेंकाना डेट करत होते. यानंतर आता लग्न बंधनात अडकणार आहेत. या साखरपुढ्याचे काही सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
संबंधित बातम्या
Anant-Radhika Pre Wedding : प्री-वेडिंगला प्रेग्नंट दीपिकावर खिळल्या नजरा; ‘दिल धडकने दो’वर कल्ला (video)
Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding : तीन खान थिरकले ‘नाटू- नाटू’ वर
ऐश्वर्या राय बच्चन दुसऱ्यांदा प्रेग्नंट? फोटो केले शेअर
दाक्षिणात्य अभिनेत्री वरलक्ष्मी सरथकुमारने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर साखरपुडा केला असल्याची माहिती देत काही फोटो शेअर केले आहेत. यावेळी या सोहळ्यात वरलक्ष्मी आणि निकोलाई दोघांनी व्हाईट रंगाच्या सेम कपडे परिधान केलं आहेत. मात्र, वरलक्ष्मीने व्हाईट साडीवर गुलाबी रंगाचे ब्लॉऊज खूपच सुंदर दितसेय. ही जोडी खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. वरलक्ष्मी आणि निकोलाई दोघांनीही फोटोला रोमँटिक पोज दिल्या आहेत.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘Engaged 💍, Love laughter and Happily Ever After, #nicholaisachdev’. असे लिहिले आहे. याशिवाय या फोटोत कपलचे काही नातेवाईकही दिसत आहेत. वरलक्ष्मी आणि निकोलाई यांच्या गळ्यात फुलांचा हारदेखील दिसत आहे. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन करत खूपसाऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. या फोटोला आतापर्यत १ लाख ६४ लाखाहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.
वर्क फ्रंन्टबद्दल बोलायचे झाल्यास, वरलक्ष्मी सरथकुमार लवकरच ‘रायन’ चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये साऊथ स्टार धनुष मुख्य भूमिकेत आहे. याआधी ती ‘हनुमान’ या चित्रपटात दिसली होती. २०१२ मध्ये आलेल्या ‘पोडा पोडी’ या चित्रपटातून वरलक्ष्मीने तिच्या करिअरला सुरुवात केली होती. यानंतर अल्पावधीतच ती साऊथ चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली.
View this post on Instagram
A post shared by Varalaxmi Sarathkumar (@varusarathkumar)
View this post on Instagram
A post shared by Varalaxmi Sarathkumar (@varusarathkumar)
View this post on Instagram
A post shared by Varalaxmi Sarathkumar (@varusarathkumar)
Latest Marathi News हनुमान फेम वरलक्ष्मी सरथकुमारने उरकला साखरपुडा (photos) Brought to You By : Bharat Live News Media.
