छत्तीसगडमध्‍ये चकमक; पोलीस हवालदार शहीद

पुढारी ऑनलाईन डेस्क: छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये आज (दि.०३) सकाळपासून चकमक झाली. यामध्ये एक नक्षलवादी ठार झाला, तर एक पोलीस हवालदार शहीद झाला आहे, असे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे. (Encounter In Chhattisgarh) कांकेर जिल्ह्यातील (छत्तीसगड) छोटेबेठिया पोलिस स्टेशन अंतर्गत हिदूर गावाजवळील संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर असताना ही चकमक झाली, हिदूर जंगलात नक्षलवाद्यांच्या … The post छत्तीसगडमध्‍ये चकमक; पोलीस हवालदार शहीद appeared first on पुढारी.

छत्तीसगडमध्‍ये चकमक; पोलीस हवालदार शहीद

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये आज (दि.०३) सकाळपासून चकमक झाली. यामध्ये एक नक्षलवादी ठार झाला, तर एक पोलीस हवालदार शहीद झाला आहे, असे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे. (Encounter In Chhattisgarh)
कांकेर जिल्ह्यातील (छत्तीसगड) छोटेबेठिया पोलिस स्टेशन अंतर्गत हिदूर गावाजवळील संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर असताना ही चकमक झाली, हिदूर जंगलात नक्षलवाद्यांच्या उपस्थितीच्या विशिष्ट माहितीच्या आधारे ही कारवाई सुरू करण्यात आली होती. (Encounter In Chhattisgarh)
चकमकीच्या घटनास्थळावरून एका नक्षलवाद्याचा मृतदेह आणि एके-47 रायफल जप्त करण्यात आली आहे.परिसरात शोधमोहीम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. छत्तीसगडच्या बस्तर भागातील सुकमा आणि विजापूर जिल्ह्यांच्या सीमेवर नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे तीन जवान, विशेष कमांडो बटालियन फॉर रिझोल्युट ऍक्शनमधील दोन जवान शहीद झाले हाेते. यानंतर अवघ्या एक महिन्यानंतर ही घटना घडली आहे. टेकुलागुडेम गाव, जिथे चकमक झाली होती, ते 2021 मध्ये आणखी एका चकमकीचे ठिकाण होते ज्यात 23 सैनिक ठार झाले होते. (Encounter In Chhattisgarh)

Chhattisgarh | Encounter breaks out between Naxalites and security forces in Kanker district. Search is underway. Further details awaited.
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) March 3, 2024

हेही वाचा:

Chhattisgarh Encounter: छत्तीसगडमध्ये नक्षलवादी- सुरक्षा दलामध्ये चकमक; ४ नक्षलवादी ठार
Encounter in Pulwama | पुलवामात सुरक्षा दलांची संयुक्त कारवाई, एक दहशतवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Rajouri Encounter : जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक

Latest Marathi News छत्तीसगडमध्‍ये चकमक; पोलीस हवालदार शहीद Brought to You By : Bharat Live News Media.