पत्नीसह दोन मुलींची कुऱ्हाडीने हत्या; चंद्रपूर हादरले

चंद्रपूर ; Bharat Live News Media वृत्तसेवा घरगुती भांडणातून (52 वर्षीय) पतीने पत्नीसह दोन मुलींचा कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केल्याची थरकाप उडवणारी घटना चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड तालुक्यात मौशी या गावात घडली. या घटनेमुळे चंद्रपूर जिल्हा हादरून गेला आहे. पत्नी अल्का तलमले (वय 40), मोठी मुलगी प्रणाली तलमले (वय 20), लहान मुलगी तेजू तलमले (वय 16) असे मृत्तांची नावे आहेत. या मध्ये मुलगा बचावला आहे. संशयीत आरोपी पती अंबादास तलमले (वय ५०) याला नागभिड पोलीसांनी अटक केली आहे.
नागभिड तालुक्याच्या ठिकाणापासून सात किमी अंतरावर मौशी गाव आहे. अंबादास तलमले हे तेथील रहिवाशी आहेत. पत्नी अल्का, मोठी मुलगी प्रणाली, लहान मुलगी तेजू व एक मुलगा असा त्यांचा कुटुंब होते. आज (रविवार) पहाटेच्या सुमारास मुलगा उठून हा एका हॉटेलात गेला होता. यावेळी वडील, पत्नी व मुली झोपेत होत्या. अंबादास तलमले याचे पत्नी सह नेहमी भांडण होत होते. त्यामुळे आज पहाटेच्या सुमारास मुलगा बाहेर गेल्यानंतर एका पाठोपाठ एक पतीने पत्नी अल्का, मुलगी प्रणाली व तेजु या तिघांना कुऱ्हाडीने जिवानिशी ठार मारले.
सकाळी घटनेची माहिती गावात पसरताच एकच खळबळ उडाली. लगेच नागभिड पोलीसांना माहिती देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी येवुन तिन्ही मृत्तदेह ताब्यात घेतले आहेत. संशयीत आरोपी पती अंबादास तलमले याला पोलीसांनी अटक केली आहे. घरगुती भांडणातून एकाच कुटुंबातील तिघांचा खूण केल्याने चंद्रपूर जिल्हा हादरून गेला आहे. या घटनेचा तपास सूरू असून, पतीने नेमके कोणत्या कारणासाठी खूण केला या बाबतचे अद्याप कारण समोर आलेले नाही. घरगुती भांडणातून खूण केल्याचे फक्त सांगितले जात आहे.
हेही वाचा :
Andhra Pradesh Train Collision: आंध्र प्रदेश रेल्वे अपघाताबाबत मोठा खुलासा; ‘पॅसेंजर ट्रेनचे चालक…”
Gold investment : साेन्यातल्या गुंतवणुकीवेळी ‘ही’ घ्या काळजी; तरच मिळेल चांगला परतावा
Lok Sabha Election 2024: ‘मविआ’सोबत अद्याप युती नाही ; अॅड. प्रकाश आंबेडकरांची स्पष्टाेक्ती
Latest Marathi News पत्नीसह दोन मुलींची कुऱ्हाडीने हत्या; चंद्रपूर हादरले Brought to You By : Bharat Live News Media.
