
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मविआ’तील पक्षांच्या प्रवक्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचा मविआत समावेश झाल्याचे स्पष्ट केले होते; परंतु, अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अद्याप मविआसोबत युती पूर्ण झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. या संदर्भातील माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. (Politics In Maharashtra)
इतर पक्षांच्या बैठकी, कार्यक्रमाला उपस्थित राहू नये- कार्यकर्त्यांना आवाहन
वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन आहे की, वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत अजूनपर्यंत युती पूर्ण झालेली नाहीये. तेव्हा इतर पक्षांकडून पक्ष बैठक किंवा कार्यक्रमाला बोलावत असतील तर त्या बैठकी, कार्यक्रमामध्ये उपस्थित राहू नये. ॲड. प्रकाश आंबेडकर व पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांची सूचना येईपर्यंत कोणीही सहभागी होऊ नये, असे देखील आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. (Politics In Maharashtra)
वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन आहे की, वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत अजूनपर्यंत युती पूर्ण झालेली नाहीये.
तेव्हा इतर पक्षांकडून पक्ष बैठक किंवा कार्यक्रमाला बोलावत असतील तर त्या बैठकी, कार्यक्रमामध्ये उपस्थित राहू नये.
ॲड. प्रकाश आंबेडकर व पक्षाच्या… pic.twitter.com/6Y8jrM9qgp
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) March 2, 2024
हेही वाचा:
Ramdas Kadam : सर्व पक्षांना संपवून भाजपला एकट्यालाच जिवंत राहायचेय का? : रामदास कदम
नाशिक : … म्हणून महाराष्ट्राला स्थान नाही; ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची टीका
विदेशात भारतीयांच्या मृत्यूची मालिका सुरुच, आयव्हरी कोस्टमध्ये दोघांचा संशयास्पद मृत्यू
Latest Marathi News ‘मविआ’सोबत अद्याप युती नाही ; अॅड. प्रकाश आंबेडकरांची स्पष्टाेक्ती Brought to You By : Bharat Live News Media.
