सर्व पक्षांना संपवून भाजपला एकट्यालाच जिवंत राहायचेय का? : रामदास कदम

मुंबई : लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता असतानाच शिवसेना आणि भाजपमध्ये जागावाटपावरून घमासान सुरू झाले आहे. कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा ठोकल्यानंतर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाजपला फैलावर घेतले. रत्नागिरीची जागा आमची हक्काची आहे, ती आम्ही सोडणार नाही, असे सुनावत सर्व पक्षांना संपवून भाजपला एकट्यालाच जिवंत राहायचे आहे का, असा संतप्त … The post सर्व पक्षांना संपवून भाजपला एकट्यालाच जिवंत राहायचेय का? : रामदास कदम appeared first on पुढारी.

सर्व पक्षांना संपवून भाजपला एकट्यालाच जिवंत राहायचेय का? : रामदास कदम

मुंबई : लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता असतानाच शिवसेना आणि भाजपमध्ये जागावाटपावरून घमासान सुरू झाले आहे. कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा ठोकल्यानंतर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाजपला फैलावर घेतले. रत्नागिरीची जागा आमची हक्काची आहे, ती आम्ही सोडणार नाही, असे सुनावत सर्व पक्षांना संपवून भाजपला एकट्यालाच जिवंत राहायचे आहे का, असा संतप्त सवाल त्यांनी केला. (Ramdas Kadam)
Ramdas Kadam : पण महायुतीत हे चालणार नाही….
कदम म्हणाले, रायगड आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेसाठी भारतीय जनता पक्ष आग्रही आहे म्हणे. दोन्ही जागांवर तुम्ही म्हणाल आम्हीच लढणार; पण रत्नागिरीची जागा आमची आहे, ती आम्ही सोडणार नाही. ती आमच्या हक्काची जागा आहे आणि ती आम्ही लढविणारच. आताचे जे खासदार आहेत त्यांची शेवटची सभा सावंतवाडी येथे आपण स्वतः घेतली होती. त्यामुळे सर्व पक्षांना संपवून भाजपला एकट्यालाच जिवंत राहायचे आहे, असा निष्कर्ष यावरून निघेल; पण महायुतीत हे चालणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
हेही वाचा 

Bengaluru Rameshwaram Cafe Blast : इडली खाल्ली अन् बॅग ठेवून गेला; रामेश्वरम कॅफे स्फोटाबाबत महत्त्वाची माहिती समोर
नांदेड : बारावीचा पेपर देऊन येणाऱ्या दहेलीतील विद्यार्थ्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात, दोन ठार
Manoj Jarange-Patil : लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत मनोज जरांगेंचे मोठे विधान, म्हणाले…
लोकसभा निवडणूक : भाजपने केली १९५ उमेदवारांची घोषणा, जाणून घ्‍या यादीतील ठळक वैशिष्ट्ये
भाजपचा उमेदवार कोण? निरीक्षकांचा अहवाल प्रदेशकडे

Latest Marathi News सर्व पक्षांना संपवून भाजपला एकट्यालाच जिवंत राहायचेय का? : रामदास कदम Brought to You By : Bharat Live News Media.