यंदा जगभरात भीषण उन्हाळ्याची भीती?

वॉशिंग्टन : 2024 मध्ये जगाच्या मोठ्या भागात भीषण उन्हाळा असण्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. ‘एल नीनो’ मुळे जागतिक तापमानवाढ आणखी तीव्र होऊ शकते. त्यामुळे यंदा अमेझॉनपासून अलास्कापर्यंत विक्रमी तापमानाची नोंद होऊ शकते. एका नव्या विश्लेषणातून ही बाब समोर आली आहे. वैज्ञानिकांचे अनुमान आहे की, बंगालचा उपसागर, दक्षिण चीन समुद्र, भारत, फिलीपाईन्स आणि कॅरेबियन क्षेत्रातील … The post यंदा जगभरात भीषण उन्हाळ्याची भीती? appeared first on पुढारी.

यंदा जगभरात भीषण उन्हाळ्याची भीती?

वॉशिंग्टन : 2024 मध्ये जगाच्या मोठ्या भागात भीषण उन्हाळा असण्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. ‘एल नीनो’ मुळे जागतिक तापमानवाढ आणखी तीव्र होऊ शकते. त्यामुळे यंदा अमेझॉनपासून अलास्कापर्यंत विक्रमी तापमानाची नोंद होऊ शकते. एका नव्या विश्लेषणातून ही बाब समोर आली आहे. वैज्ञानिकांचे अनुमान आहे की, बंगालचा उपसागर, दक्षिण चीन समुद्र, भारत, फिलीपाईन्स आणि कॅरेबियन क्षेत्रातील किनारपट्टीवरील भागात जूनपर्यंत कडक उन्हाळा जाणवू शकतो.
पश्चिम प्रशांत महासागरातून उष्णता बाहेर पडण्याच्या ‘एल नीनो’ने ऐतिहासिक रुपाने वैश्विक तापमानाला वाढवले आहे. याच कारणामुळे गतवर्ष म्हणजेच 2023 मध्येही भीषण उन्हाळा होता व ते इतिहासातील सर्वात उष्ण वर्ष ठरले होते. ‘एल नीनो’मुळे पडलेल्या भीषण उन्हाळ्याने उत्तर अमेरिका, युरोप, चीन, दक्षिण अमेरिका आणि मादागास्करमध्ये गंभीर प्रभाव दिसून आला.
नव्या विश्लेषणात कॉम्प्युटर मॉडेलचा वापर करण्यात आला आणि 2024 च्या पहिल्या सहामाहीत रीजनल हॉटस्पॉटची ओळख करण्यात आली. या काळात जागतिक तापमानवाढीचे नवे विक्रम यामुळे होऊ शकतात, असे त्यावरून दिसून आले. अशा विक्रमांची 90 टक्के शक्यता असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. चिनी हवामानतज्ज्ञ डॉ. निंग जियांग यांनी अलास्का आणि अमेझॉनच्या खोर्‍यासारख्या क्षेत्रांमध्ये वर्षभर सुरू राहणारी सागरी उष्णता, जंगलांमधील वणवे आणि अन्य प्रतिकूल परिणामांच्या वाढत्या जोखमींची शक्यता वर्तवली आहे.
Latest Marathi News यंदा जगभरात भीषण उन्हाळ्याची भीती? Brought to You By : Bharat Live News Media.