धक्कादायक! दारू प्यायला १०० रूपये न दिल्याने मुलानेच केली जन्मदात्या आईची हत्या

अमरावती, Bharat Live News Media वृत्तसेवा : दारू प्यायला १०० रूपये न दिल्याने मुलानेच जन्मदात्या आईची काठीने मारहाण करत हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि.२) जिल्ह्यातील धारणी तालुक्यात येणाऱ्या भोकरबर्डी या गावात उघडकीस आली.
गंगाबाई मोतीलाल जांबेकर (६०) असे हत्या झालेल्या आईचे तर पवन मोतीलाल जांबेकर (२३) असे आरोपी मुलाचे नाव आहे. गंगाबाई यांना पीएम किसान सन्मान योजनेमार्फत नुकतेच काही पैसे मिळाले होते. याबाबत त्यांचा मुलगा आरोपी पवन याला कळताच त्याने दारू पिण्यासाठी आईकडे १०० रूपये मागितले. मात्र गंगाबाई यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे पवन ने वाद घातला. या वादातच त्याने गंगाबाई यांच्यावर काठीने हल्ला केला. त्यात गंभीर जखमी झाल्यामुळे गंगाबाई यांचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी या घटनेची माहिती गावकऱ्यांनी धारणी पोलिसांना दिली. धारणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक जाधव यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. याप्रकरणी आरोपी मुलाला अटक करून त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Latest Marathi News धक्कादायक! दारू प्यायला १०० रूपये न दिल्याने मुलानेच केली जन्मदात्या आईची हत्या Brought to You By : Bharat Live News Media.
