PM मोदी विजयाच्‍या हॅटट्रिकसह ‘वाराणसी’त नवा विक्रम प्रस्‍थापित करणार?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लोकसभा २०२४ निवडणुकीसाठी आज (दि.२ मार्च) भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसर्‍यांदा उत्तर प्रदेशमधील वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. पंतप्रधान मोदींना विक्रमी मतांनी निवडून आणण्‍यासाठी भाजप कार्यकर्ते सज्‍ज झाले आहे. या मदारसंघात विजयाच्‍या हॅटट्रिकसह उच्‍चांकी मतांनी निवडून येण्‍याचा विक्रम प्रस्‍थापित करण्‍याचे भाजपचे लक्ष्‍य असेल. (Lok Sabha … The post PM मोदी विजयाच्‍या हॅटट्रिकसह ‘वाराणसी’त नवा विक्रम प्रस्‍थापित करणार? appeared first on पुढारी.
PM मोदी विजयाच्‍या हॅटट्रिकसह ‘वाराणसी’त नवा विक्रम प्रस्‍थापित करणार?


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : लोकसभा २०२४ निवडणुकीसाठी आज (दि.२ मार्च) भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसर्‍यांदा उत्तर प्रदेशमधील वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. पंतप्रधान मोदींना विक्रमी मतांनी निवडून आणण्‍यासाठी भाजप कार्यकर्ते सज्‍ज झाले आहे. या मदारसंघात विजयाच्‍या हॅटट्रिकसह उच्‍चांकी मतांनी निवडून येण्‍याचा विक्रम प्रस्‍थापित करण्‍याचे भाजपचे लक्ष्‍य असेल. (Lok Sabha Election 2024: PM Modi will contest elections from varanasi seat) दरम्‍यान, पंतप्रधान मोदी सलग तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक लढवणार असल्‍याचे जाहीर झाल्‍यानंतर वाराणसीत भाजपच्‍या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत आपला आनंद व्‍यक्‍त केला.
मतांच्‍या टक्‍केवारीत लक्षणीय वाढ
वाराणसी मतदारसंघातून नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्‍ये प्रथम निवडणूक लढवली होती. यावेळी त्‍याच्‍या विरोधात आम आदमी पार्टीचे उमेदवार अरविंद केजरीवाल होते. या निवडणुकीत त्‍यांना ५४.६ टक्‍के मते मिळाली होती. यानंतर २०१९ लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्‍याविरोधात समाजवादी पार्टीच्‍या शालिनी यादव यांनी निवडणूक लढवली होती. 2019 मध्ये पंतप्रधान माेदी यांना एकूण मतांपैकी 63.6 टक्के मते मिळाली होती. आता तिसऱ्यांदा वाराणसीतून लोकसभा निवडणुकीत उच्‍चांकी मतांनी निवडून येत नवा विक्रम प्रस्‍थापित करण्‍यासाठी ते सज्‍ज झाले आहेत.
वाराणसी लोकसभा मतदारसंघात 75 टक्के हिंदू, 20 टक्के मुस्लिम आणि 5 टक्के इतर मतदार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी लोकसभा मतदारसंघातील खासदार म्हणून लोकप्रिय नेते म्हणून ओळखले जातात. येथील एकूण मतदारांपैकी सुमारे ६५ टक्के शहरी आणि ३५ टक्के ग्रामीण मतदार आहेत.

VIDEO | Celebrations underway in Uttar Pradesh’s Varanasi as PM Modi to contest Lok Sabha elections from the constituency for the third consecutive time.#LokSabhaElections2024 #LSPolls2024withPTI pic.twitter.com/ZtVPXIx63c
— Press Trust of India (@PTI_News) March 2, 2024

हेही वाचा : 

BJP Lok Sabha Seat : भाजपच्या पहिल्या यादीत नवोदितांना संधी, सुषमा स्‍वराज यांच्‍या कन्‍येला उमेदवारी
लोकसभा निवडणूक : भाजपने केली १९५ उमेदवारांची घोषणा, जाणून घ्‍या यादीतील ठळक वैशिष्ट्ये

The post PM मोदी विजयाच्‍या हॅटट्रिकसह ‘वाराणसी’त नवा विक्रम प्रस्‍थापित करणार? appeared first on Bharat Live News Media.

Go to Source