परभणी : पूर्णा तालूक्यातून ९४ उमेदवार लोकसभा लढवणार: सकल मराठा समाजाचा निर्णय

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे व त्यांच्या मंत्रिमंडळाने सगेसोयरे अधिसूचना काढली. परंतू, त्याची अंमलबजावणी केली नसल्यामुळे सकल मराठा समाजात नाराजीचा सुर उमटत आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे -पाटील यांचे आंदोलन चालूच राहणार आहे.  या पार्श्वभूमीवर आज (दि. २) पूर्णा तालूका सकल मराठा समाजाची बैठक नवामोंढा … The post परभणी : पूर्णा तालूक्यातून ९४ उमेदवार लोकसभा लढवणार: सकल मराठा समाजाचा निर्णय appeared first on पुढारी.

परभणी : पूर्णा तालूक्यातून ९४ उमेदवार लोकसभा लढवणार: सकल मराठा समाजाचा निर्णय

आनंद ढोणे

पूर्णा, Bharat Live News Media वृत्तसेवा: मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे व त्यांच्या मंत्रिमंडळाने सगेसोयरे अधिसूचना काढली. परंतू, त्याची अंमलबजावणी केली नसल्यामुळे सकल मराठा समाजात नाराजीचा सुर उमटत आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे -पाटील यांचे आंदोलन चालूच राहणार आहे.
 या पार्श्वभूमीवर आज (दि. २) पूर्णा तालूका सकल मराठा समाजाची बैठक नवामोंढा येथील शेतकरी भवनात झाली. यावेळी सर्वानुमते लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी प्रत्येक गावातून एक याप्रमाणे तालुक्यातील एकूण ९४ गावांतून ९४ उमेदवार उभे करण्याचा ठराव घेण्यात आला.
त्याच बरोबर बैठकीत तालुकास्तरीय समन्वय समितीची स्थापना करण्यात येवून त्यात यापुढे मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघत नाही तोपर्यंत सरकारच्या व राजकीय पक्षाच्या सर्व कार्यक्रमावर बहिष्कार घालणे, राजकीय पुढा-यांना गावात आमंत्रित करायचे नाही. आणि आलेच तर कोणत्याही कार्यक्रमात मराठा बांधवांनी हजर राहयचे नाही,  उमेदवारांचे डिपॉझीट गावक-यांनी चंदा जमा करुन भरायचे,    यापुढे मराठा कार्यकर्ते व समाज बांधव कुठल्याही राजकीय पक्षाला मतदान करणार नाही, पुढील सर्व आंदोलने मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने एकजुटीत लोकशाही मार्गाने करण्याचा  ठराव यावेळी संमत  करण्यात आला. सदरील बैठकीस तालुक्यातील हजारो मराठा बांधव उपस्थित होते. ठरावाची जनजागृती तालूकाभर मराठा समन्वयक करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा 

परभणी : माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड यांचे निलंबन रद्द
परभणी: लक्ष्मीनगर येथील वाळू डेपो बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश‌
परभणी : पूर्णा-झिरोफाटा येथे शेतशिवारात रानटी प्राण्याचा शेळीच्या पिल्लांवर हल्ला

Latest Marathi News परभणी : पूर्णा तालूक्यातून ९४ उमेदवार लोकसभा लढवणार: सकल मराठा समाजाचा निर्णय Brought to You By : Bharat Live News Media.