चीन ‘नासा’च्या आधी आणणार मंगळावरील माती?

बीजिंग : ‘नासा’च्या पर्सिव्हरन्स रोव्हरने मंगळभूमीवर गोळा केलेले खडक-मातीचे नमुने पृथ्वीवर आणण्यास विलंब होऊ शकतो, असे वृत्त काही दिवसांपूर्वीच आले होते. ही एक अतिशय खर्चिक मोहीम असल्याने हा विलंब अपेक्षित आहे. अशा वेळी चीनने मंगळावरील असे नमुने पृथ्वीवर आणण्याची तयारी सुरू केली आहे. इतकेच नव्हे तर पुढील दशकात आपल्या अंतराळवीरांना मंगळावर पाठवण्याचेही चीनचे स्वप्न आहे. … The post चीन ‘नासा’च्या आधी आणणार मंगळावरील माती? appeared first on पुढारी.

चीन ‘नासा’च्या आधी आणणार मंगळावरील माती?

बीजिंग : ‘नासा’च्या पर्सिव्हरन्स रोव्हरने मंगळभूमीवर गोळा केलेले खडक-मातीचे नमुने पृथ्वीवर आणण्यास विलंब होऊ शकतो, असे वृत्त काही दिवसांपूर्वीच आले होते. ही एक अतिशय खर्चिक मोहीम असल्याने हा विलंब अपेक्षित आहे. अशा वेळी चीनने मंगळावरील असे नमुने पृथ्वीवर आणण्याची तयारी सुरू केली आहे. इतकेच नव्हे तर पुढील दशकात आपल्या अंतराळवीरांना मंगळावर पाठवण्याचेही चीनचे स्वप्न आहे.
यापूर्वी चंद्राच्या मागील भागात उतरून चीनने आपली ताकत जगाला दाखवली आहे. याशिवाय आपल्या तियांगगोंग स्पेस स्टेशनचा विस्तार करण्याचीही चीनने तयारी केली आहे. चंद्रावर चीन आपला एक तळ बनवणार आहे. इतकेच नव्हे तर मंगळाबाबतही चीनच्या महत्त्वाकांक्षी योजना आहेत. सध्या ‘नासा’ आणि ‘युरोपियन स्पेस एजन्सी’ने एकत्रितपणे मंगळावरील सॅम्पल रिटर्न मिशनची तयारी सुरू केलेली आहे. ‘नासा’च्या लक्ष्य आहे की 2033 च्या अखेरपर्यंत मंगळावरील हे नमुने पृथ्वीवर आणायचे. ‘नासा’च्या मोहिमेच्या दोन वर्षे आधीच आपल्याला याबाबत यश मिळावे यासाठी चीन प्रयत्नशील आहे. 2028 मध्ये अशी मोहीम सुरू करण्याची चीनची इच्छा आहे, जेणेकरून 2031 पर्यंत मंगळावरील नमुने पृथ्वीवर आणता येऊ शकतील.
The post चीन ‘नासा’च्या आधी आणणार मंगळावरील माती? appeared first on पुढारी.

बीजिंग : ‘नासा’च्या पर्सिव्हरन्स रोव्हरने मंगळभूमीवर गोळा केलेले खडक-मातीचे नमुने पृथ्वीवर आणण्यास विलंब होऊ शकतो, असे वृत्त काही दिवसांपूर्वीच आले होते. ही एक अतिशय खर्चिक मोहीम असल्याने हा विलंब अपेक्षित आहे. अशा वेळी चीनने मंगळावरील असे नमुने पृथ्वीवर आणण्याची तयारी सुरू केली आहे. इतकेच नव्हे तर पुढील दशकात आपल्या अंतराळवीरांना मंगळावर पाठवण्याचेही चीनचे स्वप्न आहे. …

The post चीन ‘नासा’च्या आधी आणणार मंगळावरील माती? appeared first on पुढारी.

Go to Source