पुणे : बॅंकेच्या नोटीस वाटपासाठी गेलेल्या व्यक्तीचा धारदार शस्त्राने भोकसून खून

कुरकुंभ/पाटस : पुढारी वृत्तसेवा : धारदार हत्यार पोटात भोकसून एकाचा खून करण्यात आला असल्याची घटना उघडकीस आली आहे. हा धक्कादायक प्रकार दौंड तालुक्यातील वासुंदे हद्दीत घडला आहे. मारेकरी अज्ञात असून दौंड पोलीस त्याचा शोध घेत आहेत. शुक्रवारी (दि. १) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. प्रविण मळेकर असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत ऋषिकेश प्रविण … The post पुणे : बॅंकेच्या नोटीस वाटपासाठी गेलेल्या व्यक्तीचा धारदार शस्त्राने भोकसून खून appeared first on पुढारी.

पुणे : बॅंकेच्या नोटीस वाटपासाठी गेलेल्या व्यक्तीचा धारदार शस्त्राने भोकसून खून

कुरकुंभ/पाटस : Bharat Live News Media वृत्तसेवा : धारदार हत्यार पोटात भोकसून एकाचा खून करण्यात आला असल्याची घटना उघडकीस आली आहे. हा धक्कादायक प्रकार दौंड तालुक्यातील वासुंदे हद्दीत घडला आहे. मारेकरी अज्ञात असून दौंड पोलीस त्याचा शोध घेत आहेत. शुक्रवारी (दि. १) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. प्रविण मळेकर असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत ऋषिकेश प्रविण मळेकर (वय ३०, रा. ५५१ गुरुवार पेठ, आधार काँम्प्लेक्स फ्लँट नंबर ३०१, युको बँकेचे समोर कस्तुरी चौक, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अज्ञात मारेकऱ्यावर दौंड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील प्रविण मळेकर घटनेच्या दिवशी सकाळी दुचाकीवरून (एमएच १२ इपी ९३३६) बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा बारामती या बॅंकेचे रिकव्हरीचे नोटीस वाटप करण्यासाठी बारामतीला गेले होते. यानंतर फिर्यादी यांना फोन आला की मळेकर तुमचे कोण आहे. कोणीतरी त्यांना चाकू मारला असून ते जखमी अवस्थेत रस्त्यावर पडले आहेत. त्यांना रूग्णवाहिकेतून विश्वराज हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार बारामती फलटण रोडवरील वासुंदे गावच्या हद्दीतील पेट्रोलपंपासमोर झाला असल्याचे सांगिण्यात आले.
फिर्यादी ऋषिकेश मळेकर हाॅस्पीटमध्ये पोहचल्यानंतर त्यांना प्रविण मळेकर यांच्या पोटात धारदार हत्याराने भोकसल्याचे सांगण्यात आले. या घटनेत प्रविण मळेकर यांच्या पाठीवर, कमरेवजवळ वार झाले होते. मळेकर यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले.
Latest Marathi News पुणे : बॅंकेच्या नोटीस वाटपासाठी गेलेल्या व्यक्तीचा धारदार शस्त्राने भोकसून खून Brought to You By : Bharat Live News Media.