
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : “पंतप्रधान नरेंद्र मोदी आपण मागीलवेळी बिहारला आला होता तेव्हा मी तुमच्या सोबत नव्हता. आता मी पुन्हा एकदा तुमच्या सोबत आहे. मात्र आता खात्री देतो की, यापुढे मी इकडे-तिकडे जाणार नाही. तुमच्या बरोबरच राहणार आहे,” अशा शब्दांमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजकीय साथ साेडणार नाही, असे वचन आज ( दि. २ मार्च) दिले. यांची ही ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी हसत स्वीकारली.
बिहारमधील औरंगाबादमध्ये आज 34,800 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, “तुम्ही आधीही बिहारला आला होता. त्यावेळी मी गायब झालो होतो; पण मी आता तुमच्यासोबत आहे. मी तुम्हाला ग्वाही देतो की. यापुढे मी इकडे-तिकडे जाणार नाही. मी तुमच्यासोबतच राहीन.”
जानेवारी महिन्यात नितीश कुमारांनी लालू प्रसाद यादव यांच्या राजद आणि काँग्रेस सोबतची युती तोडत पुन्हा एकदा भाजपबरोबर हातमिळवणी केली होती. यानंतर त्यांनी विक्रमी नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नितीश कुमार राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) परतल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच बिहार दौरा होता.
#WATCH | Bihar CM Nitish Kumar says, “…You (PM Modi) had come earlier as well, ‘par idhar hum gayab ho gaye the. Hum phir aapke saath hai.’ I assure you that I will not go here and there. ‘Hum rahenge aap hi ke saath’…” pic.twitter.com/itLbLBS5rg
— ANI (@ANI) March 2, 2024
Latest Marathi News यापुढे ‘इकडे-तिकडे’ जाणार नाही : नितीश कुमारांचे PM मोदींना ‘वचन’ Brought to You By : Bharat Live News Media.
