जळगाव शहरात गोळीबार, गुन्हा दाखल

जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा-शहरातील श्रीराम कन्या शाळेजवळ मोटरसायकलवर आलेल्या दोन जणांनी एका युवकाला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केला. सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी किंवा मृत झाला नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून संशयितास अटक केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
शहरातील नेरूळ येथे राहणारा सोहम गोपाळ ठाकरे हा त्याच्या मित्रांसोबत श्रीराम कन्या शाळेजवळ उभा असताना मोटरसायकलवर संशयित आरोपी दीक्षांत सपकाळे, गोपाळ चौधरी व त्यांचे दोन साथीदार असे चार जण त्या ठिकाणी आले. त्यांनी सोहम ठाकूरला शिवीगाळ करून तू माझ्या बहिणीचा नाद सोडला नाही तर थांब तुझा मुडदाच पडतो अशी धमकी दिली. त्यानंतर संशयितासोबत आलेल्या दुसऱ्या व्यक्तीने कमरेला लावलेली पिस्तूल काढून त्यातून सोहमच्या दिशेने गोळीबार केला.
सुदैवाने गोळी लागली नाही. याप्रकरणी सोहम ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपींना पकडण्यात आल्याची सूत्रांकडून माहिती मिळालेली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद सरवदे करीत आहे.
हेही वाचा :
दिलीप प्रभावळकर-भरत जाधवचा ‘झिंग चिक झिंग’ मराठी ओटीटीवर
Raashii Khanna : राशी खन्नाला “योद्धा” चित्रपट करताना वाटली ही खास गोष्ट
Latest Marathi News जळगाव शहरात गोळीबार, गुन्हा दाखल Brought to You By : Bharat Live News Media.
