बीड: राक्षसभुवनमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोघांविरूद्ध गुन्हा

गेवराई: Bharat Live News Media वृत्तसेवा: तालुक्यातील राक्षसभुवन येथील एका आठ वर्षींय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गावातीलच दोन नराधमांनी पीडित आठ वर्षांच्या मुलीला एकटे पाहून तिच्यावर गैरकृत केल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच आरोपींनी फिर्यादी यांच्या नातेवाईकांवर दबाब आणला होता, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते तथा डीपीआय चे लॉयर फोरचे प्रदेश अध्यक्ष अॅड. सोमेश्वर कारके यांनी या घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला दिली. त्यानंतर चकलांबा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. संशयित आरोपी फरार असून त्यांच्या शोधासाठी चकलांबा पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. चकलांबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नारायण एकशिंगे पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा
बीड : परळी नगर परिषदेमध्ये चोरी झाल्याच्या घटनेने खळबळ
बीड : पांढरवाडी पुलाजवळ दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू
Maratha Reservation : बीड – जालना सीमा सील; काही जिल्ह्यांतील इंटरनेटही बंद
Latest Marathi News बीड: राक्षसभुवनमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोघांविरूद्ध गुन्हा Brought to You By : Bharat Live News Media.
