तमन्ना भाटिया दिसणार ओडेला २ मध्ये, नव्या चित्रपटात असणार तरी काय?

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पॅन इंडियाची स्टार तमन्ना भाटिया ‘ओडेला 2’ मध्ये झळकणार आहे. आगामी सुपरनॅचरल थ्रिलर चित्रपटाचे पोस्टर आज प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. (Odela 2) तमन्ना भाटिया या चित्रपटात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. तमन्ना या चित्रपटासाठी काशीसारख्या शहरात या अलौकिक थ्रिलरचे शूटिंग सुरू करणार आहे. दिग्दर्शक अशोक तेजा दिग्दर्शित “ओडेला-२” संपत नंदी निर्मित आणि डी. मधू निर्मित आहे. (Odela 2)
लस्ट स्टोरीज २, प्लॅन ए प्लॅन बी आणि अनेक प्रकल्पांसह तमन्नाने एक अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. ‘ओडेला २’ हा सर्वात अपेक्षित चित्रपटांपैकी एक असून तिचे चाहते तिला नव्या रूपात बघण्यासाठी उत्सुक आहेत. तमन्ना भाटिया या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असून ‘ओडेला २’ मध्ये ती नेमकी काय साकारणार, याची उत्सुकता सगळ्यांना आहे आणि या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
View this post on Instagram
A post shared by Sampath Nandi (@isampathnandi)
Latest Marathi News तमन्ना भाटिया दिसणार ओडेला २ मध्ये, नव्या चित्रपटात असणार तरी काय? Brought to You By : Bharat Live News Media.
