त्याने मला आत बोलावलं अन्..अंकिताचा कास्टिंग काउचविषयी..

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेने एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेल्या कास्टिंग काउचबद्दल सांगितले. वयाच्या १९ व्या वर्षी तिला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल तिने धक्कादायक खुलासा केला आहे. (Ankita Lokhande) मुलाखतीत तिने प्रोफेशनल आणि खासगी आयुष्याबद्दलही सांगितले. (Ankita Lokhande)
अंकिताने सांगितले की, कशाप्रकारे तिने साऊथच्या चित्रपट इंडस्ट्रीचा सामना करावा लागला होता. अंकिता म्हणाली की, ‘माझ्यासोबत मुंबईतच कास्टिंग काउच झालं आहे, आणि ते साऊथ चित्रपटासाठी झालं होतं. मी एका साऊथ चित्रपटासाठी ऑडिशन दिलं होतं.
त्यानंतर मला फोन आला की, माझी निवड झाली आहे. मी म्हणाले, ठिक आहे, मी येते. मला साईन करायला जायचं होतं. मी माझ्या आई-वडिलांना सांगणार होते की, मला साईनिंग अमाऊंट मिळणार आहे. मला संशय होता की, इतक्या सहजपणे कसे झाले. इतकं चांगलं भाग्य तर नाही माझं. जेव्हा मी तिथे गेले तेव्हा मला आत बोलावंल आणि माझ्या कोऑर्डिनेटरला बाहेर प्रतीक्षा करायला सांगितली.
अंकिता पुढे म्हणाली, चित्रपट मिळवण्यासाठी मला समझोता करायला हवं. त्यानंतर अंकिता गोंधळात पडली आणि तिने पुन्हा ही गोष्ट स्पष्ट करण्यास संगितली. तेव्हा सांगण्यात आले की, चित्रपट निर्मात्यासोबत***
त्यानंतर अंकिता तेथून हे सांगून निघून गेली की, ‘तुमच्या चित्रपट निर्मात्याला टॅलेंटची गरज नाही. त्यांना तरुणी हवीय. आणि मी तशी मुलगी नाहीये.’
अंकिताने त्यादिवशी निर्णय घेतला, चित्रपट करायचे नाहीत. मी टेलीव्हिजन इंडस्ट्रीत काम करते, माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. त्यानंतर मला पवित्र रिश्तामध्ये संधी मिळाली. मी आनंदाने या मालिकेत काम केले.
View this post on Instagram
A post shared by Ankita Lokhande Jain (@lokhandeankita)
Latest Marathi News त्याने मला आत बोलावलं अन्..अंकिताचा कास्टिंग काउचविषयी.. Brought to You By : Bharat Live News Media.
