विकास आराखड्यातील कामे दर्जाहिन : एसीमध्ये बसून लादला गेला आराखडा

भीमाशंकर : श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे अभयारण्य असल्याने निसर्गप्रेमींचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. यामुळे भीमाशंकर येथे शासनाने 148 कोटींचा विकास आराखडा मोठा गाजावाजा करत मंजूर करून घेतला आहे, परंतु यातील अनेक कामे ही पूूर्ण होत आली असली तरीही स्थानिक लोकांना व भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास न करता ए. सी. मध्ये बसून बनविलेला आराखडा हा लादला गेला असल्याने … The post विकास आराखड्यातील कामे दर्जाहिन : एसीमध्ये बसून लादला गेला आराखडा appeared first on पुढारी.

विकास आराखड्यातील कामे दर्जाहिन : एसीमध्ये बसून लादला गेला आराखडा

अशोक शेंगाळे

भीमाशंकर : श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे अभयारण्य असल्याने निसर्गप्रेमींचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. यामुळे भीमाशंकर येथे शासनाने 148 कोटींचा विकास आराखडा मोठा गाजावाजा करत मंजूर करून घेतला आहे, परंतु यातील अनेक कामे ही पूूर्ण होत आली असली तरीही स्थानिक लोकांना व भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास न करता ए. सी. मध्ये बसून बनविलेला आराखडा हा लादला गेला असल्याने अनेक कामे दर्जाहीन होत आहेत. भीमाशंकर येथे 148 कोटींच्या विकास आराखड्यातून बसस्थानकाचे मजबुतीकरण (2 कोटी 50 लक्ष), 1 शौचालय युनिट, भीमाशंकर ते कोंढवळ फाटा काँक्रीट रस्ता (14 कोटी), कळमजाई सभामंडप (2 कोटी), भक्त-निवास शौचालय युनिट (20 लक्ष), जिल्हा परिषदेचे सुलभ शौचालय (2 कोटी 85 लक्ष), बॉम्बे पाँईट शौचालय दुरुस्ती (65 लक्ष), पायरी मार्ग (13 कोटी 83 लक्ष) आदी कामे बांधकाम विभाग करत आहे.
यातच पुरातत्व विभागची कामे ही पूर्णत: अपूर्ण आणि निकृष्ट आहेत. पवित्र शिवलिंग असलेले सभामंडप व मंदिर गाभारा, तर कळसाचे काम दुरुस्तीपासून गळत आहे. पवित्र भीमापात्र हे सांडपाणी, दुर्गंधीयुक्त गाळमिश्रित पाण्याने वाहत आहे. ज्ञानवापी कुंड, चोखोबा मंदिर आणि स्मशानभूमी पेशवा बारव पूल ही 5 कोटींची कामे सुरू असून ठेकेदार व अधिकारी यांच्या मनमानीने स्थानिक लोकांना आरेरावी करत तुम्हाला कोणाकडे जायचे जावा, आमचे काही होत नाही, असे म्हणत ही कामे रेटून नेली जात आहेत. भीमा उगमस्थानाचे देखील व्यवस्थित बाधंकाम केले नाही. वन्यजीव विभागात महादेव वन, गोठेवाडी पाणीपुरवठा योजना, पथदिवे, व्हीआयपी रस्ता आदी कामे जरी झाली असली तरी यात बहुतेक कामे दर्जाहीन आहेत. याबाबत स्थानिक सरपंच यांनी तोंडी व लेखी तक्रारी करूनही सुधारणा होत नाही.
सांडपाणी भीमापात्र व जलकुंडात
भीमाशंकर मंदिराभोवती असणार्‍या घरांचे सांडपाणी वाहून ते भीमापात्र व जलकुंंभात येत असल्याने येथील पावित्र्य धोक्यात आले आहे. या गोष्टीकडे प्रशासन कानाडोळा करत दुर्लक्ष करत आहे.
हेही वाचा
Raashii Khanna : राशी खन्नाला “योद्धा” चित्रपट करताना वाटली ही खास गोष्ट
ऊस जाळून गळितासाठी आणल्यास पैसे कपात होणार : ‘सोमेश्वर’चा निर्णय
NMC News :..तर नाशिक महापालिकेत पुन्हा ३१ प्रभाग
Latest Marathi News विकास आराखड्यातील कामे दर्जाहिन : एसीमध्ये बसून लादला गेला आराखडा Brought to You By : Bharat Live News Media.