Namo Maharojgar Melawa : अजित दादांकडे तिजोरीची चावी : एकनाथ शिंदे

बारामती : बारामतीत नमो रोजगार मेळावा सुरू आहे.  बारामतीला नंबर वन बनविण्याच अजित दादांचं स्वप्न आहे. अजित दादांकडे तिजोरीची चावी आहे. असे नमो रोजगार मेळाव्याला संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. या दरम्यान विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या मैदानावर हा कार्यक्रम होत असून उपमुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस आणि अजित पवारांसोबत खासदार शरद पवार उपस्थित होते. मेळाव्यात बोलतांना … The post Namo Maharojgar Melawa : अजित दादांकडे तिजोरीची चावी : एकनाथ शिंदे appeared first on पुढारी.

Namo Maharojgar Melawa : अजित दादांकडे तिजोरीची चावी : एकनाथ शिंदे

बारामती : बारामतीत नमो रोजगार मेळावा सुरू आहे.  बारामतीला नंबर वन बनविण्याच अजित दादांचं स्वप्न आहे. अजित दादांकडे तिजोरीची चावी आहे. असे नमो रोजगार मेळाव्याला संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. या दरम्यान विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या मैदानावर हा कार्यक्रम होत असून उपमुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस आणि अजित पवारांसोबत खासदार शरद पवार उपस्थित होते. मेळाव्यात बोलतांना शिंदे म्हणाले की आपलं सरकार आलं आणि 75 हजार लोकांना नोकऱ्या दिल्या गेल्या, पोलीस भरती काढली त्यात आता त्यात आरक्षणाचा लाभही घेता येईल.
स्किल डेव्हलपमेंटसाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्टीने आपण अनेक कार्यक्रम आयोजित करत आहोत. राज्यात विविध भागात रोजगार मेळावे भरविले जाणार आहेत. आपल्या सरकारचा शासन आपल्या दरी लोकाभिमुख कार्यक्रम त्या कार्यक्रमाद्वारे सुद्धा जनतेपर्यंत स्किल रोजगार पुरवत आहोत. शेतकरी, बचत गट यांच्यासाठी आवश्यक वस्तू देण्याचं काम एका छताखाली आणण्याचा काम सुद्धा आम्ही करत आहोत. शिंदे पुढे म्हणाले की आमचं पहिलं सरकार आहे. ज्यांनी युवकांना नियुक्त्या दिल्या. हे मी अभिमानाने सांगतो. बाळासाहेब सांगायचे नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देणारे हात निर्माण करा. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत. असही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे एकाच व्यासपीठावर.
एकूणच बारामतीमधील नमो महारोजगार मेळावा अनेक अंगांनी चर्चेत आहे. त्यात आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी संभाव्य लढत पाहता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर होत असलेल्या या कार्यक्रमाकडे सगळ्यांच लक्ष लागून आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, सुप्रिया सुळे, नीलम गोऱ्हे, सुनेत्रा पवार सगळे एकाच व्यासपीठावर दिसून आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेले दिसले.
हेही वाचा

धुळे जिल्हा शिवसेना शिंदे गटाच्या सहसंपर्कप्रमुख पदी विशाल देसले यांची नियुक्ती
राज्यातील तरूणांना कौशल्याप्रमाणे रोजगार मिळणार : देवेंद्र फडणवीस
Namo Maharojgar Mela: जर्मन भाषा येणाऱ्या तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी: अजित पवार

Latest Marathi News Namo Maharojgar Melawa : अजित दादांकडे तिजोरीची चावी : एकनाथ शिंदे Brought to You By : Bharat Live News Media.