धुळे जिल्हा शिवसेना शिंदे गटाच्या सहसंपर्कप्रमुख पदी विशाल देसले यांची नियुक्ती

पिंपळनेर: (जि.धुळे) Bharat Live News Media वृत्तसेवा- साक्री तालुक्यातील कासारे गावातील भूमिपुत्र तथा विद्यमान जिल्हाउपप्रमुख पदाची जबाबदारी यशस्वी रित्या सांभाळत असलेले विशाल देसले यांची धुळे जिल्हा शिवसेनेच्या सहसंपर्कप्रमुख पदावर नियुक्त करण्यात आली आहे. धुळे जिल्हा शिवसेना शिंदे गटाच्या वतीने या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली असून तसे नियुक्ती पत्र ही नुकतेच त्यांना देण्यात आले.
शिवसेने (शिंदे गटाचे) मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने शिवसेनेचे सचिव तथा उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या सूचनेनुसार धुळे लोकसभा संपर्कप्रमुख प्रसादजी ढोमसे, नंदुरबार लोकसभा संपर्कप्रमुख राजेश पाटील, जिल्हाप्रमुख डॉ.तुळशीराम गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना धुळे जिल्हा सहसंपर्कप्रमुख पदी विशाल दिसले (कार्यक्षेत्र साक्री विधानसभा व धुळे ग्रामीण विधानसभा )यांची नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथून देण्यात आली आहे. शिवसेना सचिव तथा उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते विशाल देसले यांना सहसंपर्कप्रमुख पदाची नियुक्तीपत्र देण्यात आले.
विशाल देसले यांच्या नियुक्ती बद्दल साक्री तालुक्यासह त्यांच्या मूळगावी कासारे येथील ग्रामस्थांनी कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत शुभेच्छा दिल्यात.
हेही वाचा :
Namo Maharojgar Mela: जर्मन भाषा येणाऱ्या तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी: अजित पवार
Jharkhand | झारखंडमध्ये स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार, १० जणांनी केले कृत्य
Latest Marathi News धुळे जिल्हा शिवसेना शिंदे गटाच्या सहसंपर्कप्रमुख पदी विशाल देसले यांची नियुक्ती Brought to You By : Bharat Live News Media.
