
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालमध्ये अत्याचार आणि विश्वासघातचे दुसरे नाव तृणमूल काँग्रेस आहे, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी सरकार घणाघाती टीका केली. आज (दि.२मार्च) पश्चिम बंगालमधील १५ हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नादिया जिल्ह्यातील कृष्णनगरमध्ये विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. या वेळी आयोजित सभेत पंतप्रधान मोदी म्हणाले की, केंद्र सरकार पश्चिम बंगाल राज्याला स्वावंबी अणि विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याच दृष्टीकोनातून राज्यात पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू केले जात आहेत. आज मला 15,000 रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्याचा बहुमान मिळाला आहे. वीज, रस्ते आणि रेल्वेच्या उत्तम सुविधांमुळे तुमचे जीवन सुकर होईल. या विकासकामांमुळे पश्चिम बंगालच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे, असेही ते म्हणाले.
तृणमूलच्या राजवटीत राज्यात गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार वाढला
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, पश्चिम बंगालच्या गौरवशाली इतिहासाचा एक भाग आहे, परंतु बंगालमध्ये जी ऐतिहासिक आघाडी होती, ती स्वातंत्र्यानंतर योग्य प्रकारे पुढे नेण्यात आली नाही. संधी असूनही पश्चिम बंगाल मागेच राहिला. गेल्या १० वर्षात ही दरी भरून काढण्यासाठी आम्ही येथील रेल्वे पायाभूत सुविधांवर खूप भर दिला आहे. बंगालमध्ये टीएमसीच्या राजवटीत गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार वाढला आहे. ज्या पद्धतीने तृणमूल काँग्रेस राज्य सरकार चालवत आहे, त्यामुळे बंगालची निराशा झाली आहे. पश्चिम बंगालच्या जनतेने मोठ्या अपेक्षेने तृणमूल काँग्रेसला मोठा जनादेश दिला; पण तृणमूल काँग्रेसचे हे अत्याचार आणि विश्वासघाताचे दुसरे नाव तृणमूल काँग्रेस बनले आहे. तृणमूल काँग्रेसचे प्राधान्य बंगालच्या विकासाला नाही तर भ्रष्टाचार आणि घराणेशाहीला प्राधान्य दिले आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
“Crime & corruption flourished under TMC’s rule”: PM Modi slams Mamata Banerjee
Read @ANI Story | https://t.co/yzX5puS2yw #PMModi #MamataBanerjee #WestBengal pic.twitter.com/wkQlmkWMMm
— ANI Digital (@ani_digital) March 2, 2024
हेही वाचा :
Suvendu Adhikari vs Mamata Banerjee : “त्या एक क्रूर महिला…” : शुभेंदू अधिकारींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबाेल
कोण आहे शेख शाहजहान? ज्याच्यामुळे ममता बॅनर्जी सरकार आले ‘बॅकफूट’वर
The Kerala Story च्या बंदीवरून पश्चिम बंगाल सरकारला सुप्रीम कोर्टाची नोटीस
Latest Marathi News अत्याचार, विश्वासघाताचे दुसरे नाव ‘तृणमूल’ : PM मोदींची घणाघाती टीका Brought to You By : Bharat Live News Media.
