विशेष ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स ७३,८०६ वर बंद, निफ्टी २२,४०० जवळ

पुढारी ऑनलाईन : मजबूत भारतीय अर्थव्यवस्था आणि जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर आज शनिवारच्या विशेष ट्रेडिंग सत्रात शेअर बाजाराने नवे शिखर गाठले. निफ्टीने आजच्या ट्रेडिंग सत्रात प्रथमच २२,४०० चा टप्पा ओलांडला. त्यानंतर निफ्टी ३९ अंकांच्या किरकोळ वाढीसह २२,३७८ वर बंद झाला. तर सेन्सेक्सने आज ७३,९९४ च्या अंकाला स्पर्श केला. हा सेन्सेक्सचा सर्वकालीन उच्चांक आहे. त्यानंतर … The post विशेष ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स ७३,८०६ वर बंद, निफ्टी २२,४०० जवळ appeared first on पुढारी.

विशेष ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स ७३,८०६ वर बंद, निफ्टी २२,४०० जवळ

Bharat Live News Media ऑनलाईन : मजबूत भारतीय अर्थव्यवस्था आणि जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर आज शनिवारच्या विशेष ट्रेडिंग सत्रात शेअर बाजाराने नवे शिखर गाठले. निफ्टीने आजच्या ट्रेडिंग सत्रात प्रथमच २२,४०० चा टप्पा ओलांडला. त्यानंतर निफ्टी ३९ अंकांच्या किरकोळ वाढीसह २२,३७८ वर बंद झाला. तर सेन्सेक्सने आज ७३,९९४ च्या अंकाला स्पर्श केला. हा सेन्सेक्सचा सर्वकालीन उच्चांक आहे. त्यानंतर तो ६० अंकाच्या किरकोळ वाढीसह ७३,८०६ वर बंद झाला. (Closing Bell) विशेषत: मेटल, ऑटो आणि एफएमसीजी शेअर्समध्ये अधिक तेजी दिसून आली.
१५ निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकांपैकी निफ्टी प्रायव्हेट बँक वगळता इतर सर्व निर्देशांक सकारात्मक पातळीवर बंद झाले.
सेन्सेक्सच्या तेजीत टाटा स्टील, टाटा मोटर्स, जेएसडब्ल्यू स्टील, विप्रो हे शेअर्स आघाडीवर राहिले. तर एम अँड एम, एनटीपीसी, मारुती, सन फार्मा, अल्ट्राटेक सिमेंट हे शेअर्स किरकोळ घसरले.
टाटा स्टीलचे शेअर्स तेजीत
टाटा स्टीलचे शेअर्स आज ३ टक्क्यांहून अधिक वाढून NSE वर १५६.२० रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले. त्यानंतर हा शेअर्स १५५ रुपयांवर स्थिरावला. (Tata Steel Share Price) टाटा स्टीलसह हिरो मोटोकॉर्प, टाटा मोटर्स, अदानी पोर्ट्स, जेएसडब्ल्यू स्टील हे शेअर्स एनएसईवर टॉप गेनर्स राहिले. तर एम अँड एम, मारुती, एनटीपीसी, सन फार्मा या शेअर्समध्ये किरकोळ घसरून दिसून आली.

स्टॉक एक्स्चेंज BSE आणि NSE ने अनपेक्षित काही घडल्यास सिस्टमच्या सज्जतेचे मूल्यांकन करण्यासाठी त्यांच्या धोरणाचा एक भाग म्हणून शनिवारी सुट्टीच्या दिवशी बाजार खुला ठेवण्याचा निर्णय घेतला होता. यादरम्यान NSE आणि BSE कडून डिझास्टर रिकव्हरी साइटची यशस्वी चाचणी घेण्यात आली. त्यासाठी आज शेअर बाजार ट्रेडिंगसाठी खुला करण्यात आला होता. याआधीही २ मार्च रोजी शनिवारच्या सुट्टीच्या दिवशी बाजार खुला करण्यात आला होता. एरव्ही इतर राष्ट्रीय सुट्ट्यांसह दर शनिवार आणि रविवारी शेअर बाजार बंद राहतो. सायबर हल्ला अथवा सर्व्हर क्रॅश होणे अशा प्रतिकूल परिस्थितीतही ट्रेडिंग सुरु राहू शकेल, यासाठी हे आजचे विशेष ट्रेडिंग सत्र घेण्यात आले. यामुळे ट्रेडिंगही सुरु राहील आणि डेटाही सुरक्षित राहील, हा यामागील उद्देश होता.
दोन सत्रात झाले ट्रेडिंग
आज शनिवारचे ट्रेडिंग दोन सत्रांमध्ये झाले. पहिल्या सत्रात प्राथमिक साइटवरून लाईव्ह ट्रेडिंग झाले. हे सत्र सकाळी ९:१५ ते सकाळी १० दरम्यान पार पडले. पहिल्या सत्रासाठीची प्री-ओपन वेळ सकाळी ९ ते ९.०८ होती. दुसऱ्या सत्रात डिझास्टर रिकव्हरी साइटवर स्विचओव्हरचा समावेश होता. हे सत्र सकाळी ११:३० ते दुपारी १२:३० दरम्यान चालले.
आजच्या सकाळच्या ९:१५ ते १० दरम्यानच्या पहिल्या सत्रात सेन्सेक्स २४४ अंकांनी वाढून ७३,९९० वर राहिला. तर निफ्टी ५६ अंकांच्या वाढीसह २२,३९५ वर होता.
Latest Marathi News विशेष ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स ७३,८०६ वर बंद, निफ्टी २२,४०० जवळ Brought to You By : Bharat Live News Media.