जपानमध्ये सापडला एक लाख नाण्यांचा खजिना

टोकियो : जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी प्राचीन नाणी सापडत असतात. पूर्वी लोक आपले धन सुरक्षेसाठी जमीनीत गुप्तपणे पुरून ठेवत असत व हे धन बाहेर काढले गेले नसेल तर ते शतकानुशतके असेच जमिनीत राहून जाते. आता जपानमध्ये अशाच एक लाख नाण्यांचा खजिना सापडला आहे. टोकियोपासून वायव्येस शंभर किलोमीटरवर असलेल्या मेबाशी येथे उत्खननात पुरातत्त्व संशोधकांना ही नाणी सापडली. … The post जपानमध्ये सापडला एक लाख नाण्यांचा खजिना appeared first on पुढारी.

जपानमध्ये सापडला एक लाख नाण्यांचा खजिना

टोकियो : जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी प्राचीन नाणी सापडत असतात. पूर्वी लोक आपले धन सुरक्षेसाठी जमीनीत गुप्तपणे पुरून ठेवत असत व हे धन बाहेर काढले गेले नसेल तर ते शतकानुशतके असेच जमिनीत राहून जाते. आता जपानमध्ये अशाच एक लाख नाण्यांचा खजिना सापडला आहे. टोकियोपासून वायव्येस शंभर किलोमीटरवर असलेल्या मेबाशी येथे उत्खननात पुरातत्त्व संशोधकांना ही नाणी सापडली.
एका कारखान्याच्या इमारतीसाठी खोदकाम सुरू असताना ही नाणी आढळली. त्यानंतर पुरातत्व संशोधकांनी शास्त्रीय पद्धतीने उत्खनन करून ती बाहेर काढली. त्यापैकी केवळी 334 नाण्यांचा आतापर्यंत अभ्यास करण्यात आला आहे. त्यापैकी सर्वात जुने नाणे हे मुळचे चीनचे आहे. ते इसवी सनपूर्व 175 मधील आहे. सर्वात आधुनिक नाणे हे इसवी सन 1265 मधील आहे. जपानच्या ’द असाही शिम्बुन’ या वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. ही नाणी 1060 गुंडाळ्यांमध्ये आहेत.
सर्वात जुन्या नाण्यावर ‘बानलियांग’ असे चीनी भाषेतील मजकूर कोरलेला आहे. चीनमध्ये 2200 वर्षांपूर्वी अशी बानलियांग नाणी अधिक प्रचलित होती. ‘बानलियांग’ म्हणजे ’अर्धा औंस’. ही नाणी बहुतांशी जपानच्या मध्ययुगीन काळातील आहेत. या नाण्यांच्या मध्यभागी छिद्र असून त्याचा उपयोग नाणी एकत्रितपणे दोरा किंवा तारेत ओवून ठेवण्यासाठी होत असे.
The post जपानमध्ये सापडला एक लाख नाण्यांचा खजिना appeared first on पुढारी.

टोकियो : जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी प्राचीन नाणी सापडत असतात. पूर्वी लोक आपले धन सुरक्षेसाठी जमीनीत गुप्तपणे पुरून ठेवत असत व हे धन बाहेर काढले गेले नसेल तर ते शतकानुशतके असेच जमिनीत राहून जाते. आता जपानमध्ये अशाच एक लाख नाण्यांचा खजिना सापडला आहे. टोकियोपासून वायव्येस शंभर किलोमीटरवर असलेल्या मेबाशी येथे उत्खननात पुरातत्त्व संशोधकांना ही नाणी सापडली. …

The post जपानमध्ये सापडला एक लाख नाण्यांचा खजिना appeared first on पुढारी.

Go to Source