नाशिक, जळगावमध्ये आढळले कॉपीबहाद्दर
नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात येत असलेली इयत्ता दहावीच्या परीक्षांना शुक्रवार (दि. १)पासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात एक आणि जळगावमधील यावलमध्ये एक असे दोन कॉपीबहाद्दर पकडले असून, नियमावलीनुसार त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे. हे दोन प्रकरणे वगळता बाकी संपूर्ण विभागामध्ये पहिला पेपर शांततेत पार पडला.
उत्तर महाराष्ट्रातून सुमारे दोन लाख विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील परीक्षार्थीची संख्या सर्वाधिक असून, जिल्ह्यातून ९३,५२१ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. विभागातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांची परीक्षा नाशिक विभागीय मंडळाच्या माध्यमातून घेतली जाते.
शुक्रवार (दि. १ )पासून या परीक्षेला सुरूवात झाली आहे. सध्या बारावीच्या विद्यार्थ्यांची देखील परीक्षा सुरू आहे. तर आता दहावीची परीक्षाही होत असल्याने शिक्षण विभागाची यंत्रणा गेल्या पंधरा दिवसांपासूनच कामाला लागली होती. या परिक्षेला नाशिक जिल्ह्यातून ९३ हजार ५२१, धुळे जिल्ह्यातून २८ हजार ५४२, जळगाव जिल्ह्यातून ५६ हजार ९७४ आणि नंदुरबार जिल्ह्यातून २० हजार ८२९ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. यामध्ये सर्वाधिक विद्यार्थी संख्या नाशिक जिल्ह्याची आहे तर त्या खालोखाल जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची संख्या आहे. विभागातील एकूण २ हजार ७९२ शाळांमधील १ लाख ९९ हजार ८६६ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.
हेही वाचा :
Nashik News : जिल्ह्यात वनहक्काचे २२ हजार दावे फेटाळले, आजपर्यंत ‘इतके’ क्षेत्र आदिवासींना वितरित
Anganewadi Yatra : आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी जिल्ह्यातून १४५ एसटी बस
Latest Marathi News नाशिक, जळगावमध्ये आढळले कॉपीबहाद्दर Brought to You By : Bharat Live News Media.