नाशिक जिल्ह्यातील ३० सहकारी संस्थांच्या निवडणूकीला स्थगिती

नाशिक पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणूकीची आदर्श आचारसंहिता मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता असल्याने सहकार विभागाने ज्या संस्थांची मतदार यादीवर काम सुरु आहे. अशा संस्थांच्या निवडणूकांना स्थगीती दिली आहे. यामध्ये जिल्ह्यातील 30 संस्थांचा समावेश आहे. तर निवडणूक प्रक्रीयेमध्ये असलेल्या ब गटातील १७ आणि तालुकास्तरावरील २६ यांच्या निवडणूका ठरल्या वेळेत होणार आहे. जिल्ह्यातील ३० सहकारी संस्थांची निवडणुकीसाठीची … The post नाशिक जिल्ह्यातील ३० सहकारी संस्थांच्या निवडणूकीला स्थगिती appeared first on पुढारी.

नाशिक जिल्ह्यातील ३० सहकारी संस्थांच्या निवडणूकीला स्थगिती

नाशिक Bharat Live News Media वृत्तसेवा- लोकसभा निवडणूकीची आदर्श आचारसंहिता मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता असल्याने सहकार विभागाने ज्या संस्थांची मतदार यादीवर काम सुरु आहे. अशा संस्थांच्या निवडणूकांना स्थगीती दिली आहे. यामध्ये जिल्ह्यातील 30 संस्थांचा समावेश आहे. तर निवडणूक प्रक्रीयेमध्ये असलेल्या ब गटातील १७ आणि तालुकास्तरावरील २६ यांच्या निवडणूका ठरल्या वेळेत होणार आहे.
जिल्ह्यातील ३० सहकारी संस्थांची निवडणुकीसाठीची प्रक्रीया सहकार विभागातर्फे सुरु करण्यात आलेली होती. यामध्ये मतदार यादीची दुरुस्ती, हरकती व अंतिम यादी प्रसिद्धीची प्रक्रिया सध्या सुरू असून १५ मार्चच्या दरम्यान निवडणूक प्रक्रिया सुरू होऊ शकते. ग्रामीण भागातील १५ विविध कार्यकारी सोसायट्यांसह कर्मचारी पतसंस्थांच्या निवडणुकांचा समावेश होता.
दरम्यान, नाशिकच्या वनविकास कर्मचारी सहकारी पतसंस्थेसह नांदगाव येथील समृद्धी सहकारी बँक, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. रोझे व लखाणी (ता. मालेगाव), खामगाव (ता. येवला), मुखेड (ता. येवला), लोखंडेवाडी (ता. दिंडोरी), भादवण (ता. कळवण) येथील विकासोच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. रिंग गिअर्स कर्मचारी पतसंस्था मुसळगाव ता. सिन्नर), नाशिक जिल्हा पोलिस को. सोसायटी, एअरफोर्स सेवकांची सोसायटी (देवळाली), रिषभ सेवकांची सहकारी पतसंस्था (सातपूर), महाराष्ट्र समाज सेवा संघ सेवकांची पतपेढी (नाशिक), जिल्हा शासकीय अभियंता पगारदार सहकारी पतसंस्था (नाशिक), वीज कामगार सहकारी पतसंस्था (नाशिक), डेल्टा मॅग्नेटस् कर्मचारी सोसायटी (अंबड, नाशिक) या संस्थांच्या संभाव्य निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे, मात्र यांच्या निवडणूकांना स्थगिती देण्यात आली आहे.
हेही वाचा :

Anganewadi Yatra : आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी जिल्ह्यातून १४५ एसटी बस
Nashik News : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत ‘ट्रॅफिक सेल’, आठ पदांना स्थायीची मंजुरी

Latest Marathi News नाशिक जिल्ह्यातील ३० सहकारी संस्थांच्या निवडणूकीला स्थगिती Brought to You By : Bharat Live News Media.