जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

ज्यो. मंगेश महाडिक
मेष ः तुमचे हास्य हे नैराश्य घालविण्यासाठीचा उत्तम उपाय ठरेल. आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल. प्रलंबित देणी परत मिळवाल.
वृषभ ः सामाजिक आयुष्य दुर्लक्षित करू नका. त्यामुळे केवळ ताण कमी होणार नाही तर आपली द्विधावस्थाही नाहीशी होईल.
मिथुन ः कामातील चुका कबूल करणे फायदेशीर ठरेल, पण स्वत:ला कसे सुधारता येईल याची कारणमीमांसा करणे गरजेचे.
कर्क ः काळ उत्तम आहे. एखाद्या आनंदी प्रसन्न सहलीला जाण्याची शक्यता. या सहलीमुळे ऊर्जा आणि आवड पुन्हा टवटवीत होईल.
सिंह ः आरोग्य एकदम चोख असेल. तुमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे धमाल, आनंद आणि समाधान वाटेल. दिवस आनंदात जाईल.
कन्या ः आर्थिक फायदा शक्य. कुटुंबाबरोबरचे संबंध, स्नेह नव्याने द़ृढ करण्याचा दिवस. आनंदासाठी नव्या नातेसंबंधाकडे पाहावे लागेल.
तूळ ः प्रिय व्यक्तीला समजून घ्या. व्यवसायातील कौशल्याची कसोटी लागण्याची शक्यता. अपेक्षित फळासाठी लक्ष प्रयत्नावर केंद्रित करा.
वृश्चिक ः नवीन प्रकल्प आणि योजना राबविण्यासाठी उत्कृष्ट दिवस. वेळेसोबत चालणे तुमच्यासाठी उत्तम असेल.
धनु ः परिस्थिती नियंत्रणात ठेवाल. दिवसाची सरुवात जरी चांगली असली तरी, संध्याकाळच्या वेळी चिंतित व्हाल.
मकर ः उत्साह वाढविण्यासाठी सुंदर उज्ज्वल आणि वैभवशाली चित्र मनात ठसवा. पैशाच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल.
कुंभ ः देणगी आणि धर्मादाय कामामध्ये स्वत:ला गुंतवा, त्यातून तुम्हाला मन:शांती लाभेल. अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाही.
मीन ः प्रेम करण्याची संधी न दवडल्यास आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस असेल. नात्यातल्या तक्रारी दू होतील.
Latest Marathi News जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? Brought to You By : Bharat Live News Media.
