जुगार अड्ड्यावर छापा; 22 जणांवर गुन्हा

मुरगूड, पुढारी वृत्तसेवा : कागल तालुक्यातील अर्जुनी पैकी अर्जुननगर येथे महालक्ष्मी सामाजिक कला, क्रीडा व शैक्षणिक संस्थेच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या विशेष पथकाने छापा टाकून 22 संशयितांकडून एक स्कॉर्पिओ, चार दुचाकी, 14 मोबाईल हँडसेट व रोकड असा एकूण 7 लाख 90 हजार 840 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. स्थानिक गुन्हे … The post जुगार अड्ड्यावर छापा; 22 जणांवर गुन्हा appeared first on पुढारी.

जुगार अड्ड्यावर छापा; 22 जणांवर गुन्हा

मुरगूड, Bharat Live News Media वृत्तसेवा : कागल तालुक्यातील अर्जुनी पैकी अर्जुननगर येथे महालक्ष्मी सामाजिक कला, क्रीडा व शैक्षणिक संस्थेच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या विशेष पथकाने छापा टाकून 22 संशयितांकडून एक स्कॉर्पिओ, चार दुचाकी, 14 मोबाईल हँडसेट व रोकड असा एकूण 7 लाख 90 हजार 840 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने गुरुवारी (दि. 29) मध्यरात्री अर्जुनी येथे श्री महालक्ष्मी सामाजिक कला, क्रीडा व शैक्षणिक संस्थेच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या ठिकाणी अंदर-बाहर नावाचा जुगार 22 जण पैसे लावून खेळत असताना आढळून आले. त्यांच्याकडील 2 लाख 29 हजार 840 ची रोख रक्कम तसेच इतर ऐवज असा 7 लाख 90 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईत चालक अनिल व्यंकटेश यादव (रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर), मालक युवराज भाऊसो जाधव, (रा. खडकेवाडा, ता. कागल), जागा मालक विनायक महादेव कामटे, (रा. अर्जुननगर, अर्जुनी) कामगार अब्दुल रहिमान मकडी (रा. अभयनगर, उर्मिला पार्क, सांगली) तसेच जुगार खेळण्यासाठी आलेले रवींद्र बाबुराव गुरव (रा. पांगिरे, ता. निपाणी, जि. बेळगाव), कैलास गणेश भिसे (रा. 6 वी गल्ली, शिवाजीनगर, निपाणी), मोहन मारुती चव्हाण (रा. शिवाजीनगर, निपाणी), अशोक राजू शिकलगार (रा. आंबेडकर सर्कल, महालिंगपूर, ता. मुधोळ), दीपक सदाशिव दौडमणी (रा. रबकवी, ता. मुधोळ), मुत्तू पंडित मैत्री (रा. रबकवी, ता. मुधोळ), बसवराज लकमा पुजारी (रा. नांगनूर, ता. गोकाक), राहुल रतन शिकलगार (रा. महालिंगपूर, ता. मुधोळ), सर्फराज वाहिद बारगीर (रा. गुरुवार पेठ, मिरज), दस्तगीर दावल शेख (रा. ख्वाजा झोपडपट्टी, मिरज), मुनाफ खली कलाल (रा. शिवाजीनगर, निपाणी), आप्पासाहेब धोंडिराम कुरळुपे (रा. अक्कोळ, ता. चिक्कोडी), केशव बसाप्पा कोरवी (रा. खडकलाट, ता. चिक्कोडी), मोहन मुराप्पा शिंत्रे (रा. पडलीहाळ, ता. निपाणी) अनिल सुरेश पवार ऊर्फ पाथरूट (रा. शिवाजीनगर, निपाणी), कृष्णात पाटील (डिग्रज, जि. सांगली), सलीम इलाई मुजावर (रा. हमालवाडी, कुपवाड) अशा 22 जणांविरुद्ध मुरगूड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत जिल्हा पोलिस प्रमुख महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ, पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे, खंडेराव कोळी, शिवाजी जामदार, विलास किरोळकर, संजय पडवळ, सचिन देसाई व संतोष पाटील यांनी सहभाग घेतला.
Latest Marathi News जुगार अड्ड्यावर छापा; 22 जणांवर गुन्हा Brought to You By : Bharat Live News Media.