सहकारातून समृध्दी वैमनिकॉमचे मोठे योगदान : केंद्रीय मंत्री बी. एल. वर्मा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : देशातील शेतकर्‍यांची गरज ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 साली स्वतंत्र सहकार मंत्रालयाची स्थापना केल्याने गेल्या तीन वर्षांमध्ये या मंत्रालयाच्या माध्यमातून विविध उपक्रमांद्वारे मोठ्या प्रमाणावर विकासाचे उपक्रम राबविण्यात आले आहेत. त्यामध्ये वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेचे (वैमनीकॉम) मोठे योगदान असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा यांनी येथे … The post सहकारातून समृध्दी वैमनिकॉमचे मोठे योगदान : केंद्रीय मंत्री बी. एल. वर्मा appeared first on पुढारी.

सहकारातून समृध्दी वैमनिकॉमचे मोठे योगदान : केंद्रीय मंत्री बी. एल. वर्मा

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : देशातील शेतकर्‍यांची गरज ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 साली स्वतंत्र सहकार मंत्रालयाची स्थापना केल्याने गेल्या तीन वर्षांमध्ये या मंत्रालयाच्या माध्यमातून विविध उपक्रमांद्वारे मोठ्या प्रमाणावर विकासाचे उपक्रम राबविण्यात आले आहेत. त्यामध्ये वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेचे (वैमनीकॉम) मोठे योगदान असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा यांनी येथे काढले.
वैमनीकॉमच्या संगम या नवनिर्मित आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणार्थी वसतिगृहाचे वर्मा यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 1) उद्घाटन करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी नवी दिल्ली येथील आफ्रिकन-एशियन रुरल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचे (एएआरडीओ) सचिव डॉ. मनोज नरदेवसिंग, पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. पराग काळकर, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस महानिरीक्षक संजय शिंदे, वैमनीकॉमच्या संचालिका डॉ. हेमा यादव, डॉ. वाय. एस. पाटील, आर. के. मेनन आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. वर्मा म्हणाले की, वैमनीकॉम ही सहकार क्षेत्रात शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन आणि सल्ला सेवाक्षेत्रात अग्रणी संस्था आहे.
कृषी बँकिंग क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार आणि प्रशिक्षण केंद्राच्या (सीक्टैब) माध्यमातून वैमनीकॉम सार्क देशांसाठी सहकार, कृषी आणि बँकिंग क्षेत्रासाठी सहयोगात्मक आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमदेखील आयोजित करते. सीक्टैबद्वारे आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सार्क आणि इतर देशांमधले सहभागी नेहमीच येतात. अशा विशिष्ट आणि आंतरराष्ट्रीय सहभागींची निवासी आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणार्थी वसतिगृह बांधण्यात आले आहे. हेमा यादव म्हणाल्या, देशभरातील सहकारी संस्थांच्या 15 हजारांहून अधिक सहभागींना प्रशिक्षित केले आहे.
त्यापैकी पन्नास प्रशिक्षणार्थी दुग्ध सहकारी, मत्स्यपालन सहकारी आणि सहकारी बँका इत्यादींतील महिला आहेत. डॉ. पराग काळकर म्हणाले, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणार्थी वसतिगृह भविष्यात भारताला एक प्रमुख सहकारी शिक्षण-प्रशिक्षण केंद्र म्हणून प्रस्थापित करेल. त्याचबरोबर वैमनीकॉम संस्थेला विद्यापीठाचा दर्जा द्यावा. पुणे विद्यापीठ आणि वैमनीकॉम यांच्या सहकार्याने पुणे विद्यापीठात लवकरच ‘सहकार क्षेत्रातील व्यवस्थापन’ हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. सूत्रसंचालन सोनल कदम, तनुजा फड यांनी केले. आर. के. मेनन यांनी आभार मानले.
हेही वाचा

दहावीच्या परीक्षेला सुरुवात : मराठीचा पेपर सोपा; आता वेध इंग्रजीचे
जोतिबा देवस्थानसाठी प्राधिकरण
मुंडे विरुद्ध मुंडेंसह शरद पवार यांचे अनेक संघर्षांना आशीर्वाद

Latest Marathi News सहकारातून समृध्दी वैमनिकॉमचे मोठे योगदान : केंद्रीय मंत्री बी. एल. वर्मा Brought to You By : Bharat Live News Media.